“ठाकरे सरकार भाजपच्या 4 बड्या नेत्यांना तुरुंगात पाठवणार होतं”, नव्या दाव्याने खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

BJP l लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. ज्यावेळी राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होत त्यावेळी महाविकास आघाडी सरकार भाजप पक्षाच्या दिग्गज नेत्यांना अटक करण्याचा असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

माविआ या 4 नेत्यांना तुरुंगात टाकणार होते :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. भाजपच्या 4 दिग्गज नेत्यांना एखाद्या प्रकरणात गुंतवून अटक करण्याचा डावा महाविकास आघाडीने आखला होता असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. याशिवाय 2024 च्या निवडणुकीसाठी आमदार फोडण्याचा देखील डाव माविआ होता असं एकनाथ शिंदेनी एका मुलाखतीत सांगितले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आरोपांमध्ये असे सांगण्यात आले आहे की, महाविकास आघाडी सरकारने 2022 मध्ये आशिष शेलार, देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर यांना अटक करण्याची योजना आखली होती. या चारही दिग्गज नेत्यांना एखाद्या प्रकरणात गुंतवून त्यांना अटक करण्याचा डाव रचला होता. याशिवाय 2024 च्या निवडणुकीसाठी आमदार देखील फोडणार असल्याची योजना आखण्यात आली होती असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

BJP l ठाकरे कुटुंबामध्ये मुख्यमंत्रीपद हवं होतं : एकनाथ शिंदे

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना नेहमीच मुख्यमंत्री व्हायचं होतं. ते त्यांचं स्वप्न देखील होतं. मात्र 2019 विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर येताच त्यांनी आपण सर्व पर्याय खुले ठेवले असल्याचं सांगितलं आहे. उद्धव ठाकरेंना पाच वर्षासाठी मुख्यमंत्री व्हायचं होतं. तसेच त्यांना ठाकरे कुटुंबामध्ये मुख्यमंत्रीपद हवं होतं असा खळबळजनक दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. याशिवाय आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याच्या प्रयत्नात मी स्पीडब्रेकर ठरत होतो असा दावा देखील शिंदेनी केला आहे.

मात्र शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावाचा प्रस्ताव दिल्याचं एकनाथ शिंदे यांनी नाकारलं आहे. याउलट उद्धव ठाकरे यांनी आपल्याला तुम्हाला मुख्यमंत्री करु असं सांगितलं असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

News Title- Thackeray government was going to send 4 big leaders of BJP to jail

महत्त्वाच्या बातम्या- 

…तर एकनाथ शिंदेना जेलमध्ये टाकायचा प्लॅन; ‘या’ नेत्यानी केला गौप्यस्फोट

महाराष्ट्रात काँग्रेसला धक्क्यावर धक्के; आणखी एका नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी

नारायण राणे सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा आला समोर

‘छत्रपती शिवरायांची क्षमा मागून…’; चिन्मय मांडलेकरने घेतला मोठा निर्णय

उष्माघाताची बातमी वाचताना अँकर स्वतःच कोसळली, Video होतोय व्हायरल