छ. संभाजीनगर मतदारसंघात ट्विस्ट; शिंदे गटाचं टेंशन वाढलं

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Vinod Patil | लोकसभा निवडणुकीमुळे देशासह राज्याचं वातावरण चांगलंच तापलं आहे. सर्वत्रच उमेदवारांच्या प्रचारसभा पाहावयास मिळत आहेत. अशात छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ सध्या चर्चेत आला आहे. संभाजी नगर लोकसभेसाठी महायुतीकडून शिवसेनेचे नेते तथा मंत्री संदिपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

मात्र, शिवसेनेच्या या जागेवर मराठा आंदोलनाचे नेते विनोद पाटील यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली. यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांची भेटदेखील घेतली. मविआकडून या जागेवर उद्धव ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलंय. तर, महायुतीकडून संदीपान भुमरे यांचं नाव जाहीर करण्यात आलंय. अशात विनोद पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे सांभाजीनगर मतदारसंघात अजूनच ट्विस्ट वाढला आहे.

शिंदे गटाच्या जागेवर ‘या’ नेत्याचा दावा

विनोद पाटील हे महायुतीकडून छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. महायुतीकडून या जागेवर उमेदवार जाहीर केला असताना देखील विनोद पाटील (Vinod Patil) यांनी मोठी भूमिका घेतली आहे. त्यांनी आज (22 एप्रिल) नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय हालचालींना अजूनच वेग आला आहे.

विनोद पाटील यांनी या जागेवर निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे. महायुतीकडून उमेदवारी मिळाली तर मी ही जागा लढणार आणि नाही मिळाली तरीही मी ताकतीने ही निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आता महायुतीने काय ते ठरवायचं आहे, असं विनोद पाटील यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे शिंदे गटाचं नक्कीच टेंशन वाढलंय.

विनोद पाटील यांची मोठी घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचीही इच्छा होती की मी इथून निवडणूक लढवावी. मात्र महायुतीमधील दोन आमदार आणि एक राज्यसभा सदस्य यांचा माझ्या उमेदवारीला विरोध होता. या निर्णयावर अजूनही पुनर्विचार होईल, असा विश्वास विनोद पाटील यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी विनोद पाटील यांनी भूमरे यांच्याबाबत वक्तव्य करत मोठी घोषणा केली. ‘संदीपान भुमरे हे माझ्या आजोबाच्या वयाचे आहेत. त्यांच्याबद्दल मला सन्मान आहे. मला त्यांच्याबद्दल कुठलीही नाराजी नाही. पण मला जिल्ह्याचे युवकांचे प्रश्न पडण्यासाठी दिल्लीला जायचं आहे. माझी बांधिलकी माझ्या जिल्ह्याच्या तरुणांशी आहे. त्यासाठी मी लढतो आहे. मी 100% निवडणूक लढणार आहे.’, अशी घोषणाच विनोद पाटील (Vinod Patil) यांनी केली आहे. फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर विनोद पाटील यांनी हा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात आता वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत.

News Title : Vinod Patil expressed desire to contest in Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha Constituency

महत्त्वाच्या बातम्या –

राज्यात ‘या’ भागांना वीजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा इशारा

मुंबईचा आज राजस्थान रॉयल्सशी सामना, कोण मारणार बाजी?

‘या’ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल

अरे व्हा! आता फुकटात आधारकार्ड अपडेट करता येणार; जाणून घ्या प्रोसेस

ट्विंकल खन्नाचे दाऊद इब्राहिमसोबत संबंध?, अखेर ट्विंकलने सोडलं मौन म्हणाली…