मुंबईचा आज राजस्थान रॉयल्सशी सामना, कोण मारणार बाजी?

MI vs RR | आज 22 एप्रिलरोजी मुंबईचा सामना पॉइंट टेबलमध्ये अग्रस्थानी असलेल्या राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. राजस्थानने आतापर्यंत 7 सामने खेळले असून त्यापैकी त्यांना फक्त एका सामन्यात अपयश आलंय. त्यामुळे मुंबईला राजस्थानशी खेळताना अधिक प्रभावी कामगिरी करावी लागणार आहे.

दुसरीकडे मुंबईचा संघ हा पॉइंट टेबलमध्ये 7 व्या स्थानी असून मुंबईला आतापर्यंत फक्त 3 सामने जिंकता आले आहेत. गेल्या चार सामन्यांत मुंबईला 3 सामन्यांत यश आलंय. त्यामुळे आज संघ विजयी लय कायम रखण्यावर भर देईल.

मुंबईचा स्टार गोलंदाज बुमराह ‘आयपीएल’मध्ये अधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत शीर्षस्थानी आहे. मात्र, त्याला इतर गोलंदाजांकडून म्हणावी तशी साथ मिळालेली नाही. आकाश मढवाल व कर्णधार हार्दिक पंड्यालाही कामगिरीत सातत्य राखता आलेलं नाही. तर, माजी कर्णधार रोहित चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यात सूर्यकुमार यादव लयीत असणे ही मुंबईच्या दृष्टीने सर्वात जमेची बाजू आहे.

MI vs RR सामना रंगणार

राजस्थान संघाबाबत बोलायचं झाल्यास ट्रेंट बोल्ट जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने मागील सामन्यात मुंबईच्या फलंदाजांना अडचणीत आणलं होतं. युजवेंद्र चहलने 12 गडी बाद करत संघासाठी चमक दाखवली आहे. मात्र, रविचंद्रन अश्विनला तितका प्रभाव पाडता आलेला नाही.

फलंदाजीमध्ये रियान परागने आतापर्यंत 318 धावा केल्या आहे. कर्णधार संजू सॅमसननेही 276 धावा करत आपलं योगदान दिलंय. जोस बटलरने कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध आपल्या खेळीच्या जोरावर संघाला विजय मिळवून दिला होता.शिम्रॉन हेटमायरही आक्रमक खेळ करत आहे. त्यामुळे राजस्थानविरुद्ध विजय मिळवायचा झाल्यास मुंबईला सर्वच विभागांत कामगिरी उंचवावी लागणार आहे.

अशी असेल MI vs RR संभाव्य प्लेयिंग 11

मुंबई इंडियन्स (MI) संभाव्य प्लेइंग 11 : इशान किशन (wk), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (c), तिलक वर्मा, टिम डेविड, मोहम्मद नबी, रोमारियो शेफर्ड, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह, गेराल्ड कोएत्जी, आकाश मधवाल

राजस्थान रॉयल्स (RR) संभाव्य प्लेयिंग 11 : यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (c & wk), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, आवेश खान, युझवेंद्र चहल.

News Title : MI vs RR match today

महत्त्वाच्या बातम्या-

नारायण राणे सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा आला समोर

‘छत्रपती शिवरायांची क्षमा मागून…’; चिन्मय मांडलेकरने घेतला मोठा निर्णय

उष्माघाताची बातमी वाचताना अँकर स्वतःच कोसळली, Video होतोय व्हायरल

खडसेंच्या भाजप प्रवेशावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले ‘इच्छा नसतानाही…’

“…म्हणून फडणवीसांचे पंख छाटण्यात आले अन् त्यांना उपमुख्यमंत्री केलं”