राज्यात ‘या’ भागांना वीजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maharashtra Weather Latest update | महाराष्ट्रासह देशातील 12 राज्यांत उष्णतेच्या अलर्टसोबत अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. हवामान विभागाने राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर मुंबई, ठाण्यात उष्णतेच्या लाटेपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

पाऊस पडल्याने तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मात्र या अवकाळीमुळे शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. काही ठिकाणी आंब्याच्या बागेचं बरंच नुकसान झालंय. बुलढाण्यात तर अनेक भागात सकाळपासून विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाच्या सरी पाहायला मिळत आहेत.

‘या’ भागांना यलो अलर्ट

दरम्यान, हवामान विभागाने राज्यातील सोलापूर, बीड , लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या ठिकाणी काही भागात विजांच्या कडकडटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

मुंबई आणि ठाण्यात तापमान प्रचंड वाढल्याने (Maharashtra Weather Latest update) येथे उष्णतेची लाट आल्याचं दिसून आलं. आज या भागात उष्णतेपासून थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरांत आकाश मुख्यतः निरभ्र राहील.

‘या’ भागांना उष्णतेपासून दिलासा मिळणार

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 28 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून आता दिलासा मिळेल.

यासोबतच देशभरात मराठवाडा, विदर्भ, ओडिशा, झारखंड, बिहार आणि उत्तर पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी विजांचा गडगडाट आणि गारपिटीसह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पुढील 24 तासांत पश्चिम हिमालयात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि हिमवृष्टी होऊ शकते.

News Title –  Maharashtra Weather Latest update

महत्त्वाच्या बातम्या –

नारायण राणे सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा आला समोर

‘छत्रपती शिवरायांची क्षमा मागून…’; चिन्मय मांडलेकरने घेतला मोठा निर्णय

उष्माघाताची बातमी वाचताना अँकर स्वतःच कोसळली, Video होतोय व्हायरल

खडसेंच्या भाजप प्रवेशावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले ‘इच्छा नसतानाही…’

“…म्हणून फडणवीसांचे पंख छाटण्यात आले अन् त्यांना उपमुख्यमंत्री केलं”