ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘या’ योजना ठरतायेत लाभदायक; मिळतोय भरघोस व्याजदर

Senior Citizen Scheme l देशात गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत पण आजही लोक एफडीमध्ये पैसे गुंतवतात. ज्येष्ठ लोकांना लक्षात घेऊन बँकेने अनेक एफडी योजना आणल्या आहेत. जे वृद्धांना गुंतवणुकीवर चांगला परतावा देत आहे. अशातच SBI आणि HDFC ने देशातील ज्येष्ठ नागरिकांना लक्षात घेऊन एक विशेष FD योजना आणली आहे. SBI V Care योजना SBI ने आणली आहे आणि HDFC बँक सिनियर सिटिझन केअर FD योजना HDFC ने सुरू केली आहे. या दोन्ही FD योजनांमध्ये नागरिकांना किती व्याज मिळत आहे हे जाणून घेऊयात…

HDFC बँक सीनियर सिटीझन केअर एफडी योजना :

HDFC बँकेने 60 वर्षांवरील लोकांसाठी खास FD योजना आणली आहे. या योजनेचे नाव HDFC बँक सीनियर सिटीझन केअर एफडी योजना आहे. बँक ही योजना 2020 पासून चालवत आहे. या योजनेअंतर्गत, बँक ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 0.50 टक्के व्यतिरिक्त 0.25 टक्के अतिरिक्त व्याजदर देत आहे.

अशा परिस्थितीत बँक या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 0.75 टक्के अतिरिक्त व्याजाचा लाभ देत आहे. ही बँक 5 ते 10 वर्षांच्या एफडी योजनेवर 7.75 टक्के व्याज देत आहे. हे व्याज 5 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडी योजनांवर दिले जात आहे. बँकेने या योजनेतील गुंतवणुकीची अंतिम मुदत 11 मे 2024 पर्यंत वाढवली आहे.

Senior Citizen Scheme l SBI WeCare FD योजना :

SBI ने खासकरून ज्येष्ठ नागरिकांसाठी SBI WeCare FD योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत बँक ग्राहकांना 5 वर्षे ते 10 वर्षांपर्यंत FD योजना देत आहे. या योजनेअंतर्गत बँक वृद्धांना 0.50 टक्के अधिक व्याज देत आहे.

या सरकारी योजनेत तुम्ही 30 सप्टेंबरपर्यंत गुंतवणूक करू शकता. बँक या विशेष FD योजनेअंतर्गत 5 ते 10 वर्षांसाठी 7.50 टक्के व्याज देत आहे. अशापरिस्थितीत एचडीएफसी बँकेच्या विशेष एफडी योजनेवर ग्राहकांना जास्त परतावा मिळत आहे.

News Title- Senior Citizen Scheme

महत्त्वाच्या बातम्या- 

‘या’ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल

अरे व्हा! आता फुकटात आधारकार्ड अपडेट करता येणार; जाणून घ्या प्रोसेस

ट्विंकल खन्नाचे दाऊद इब्राहिमसोबत संबंध?, अखेर ट्विंकलने सोडलं मौन म्हणाली…

“ठाकरे सरकार भाजपच्या 4 बड्या नेत्यांना तुरुंगात पाठवणार होतं”, नव्या दाव्याने खळबळ

…तर एकनाथ शिंदेना जेलमध्ये टाकायचा प्लॅन; ‘या’ नेत्यानी केला गौप्यस्फोट