राहाच्या जन्मानंतर आलिया करतेय ‘या’ गोष्टीचा सामना, म्हणाली..

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Alia Bhatt | अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर दोघेही सुखी वैवाहिक आयुष्य जगत आहेत. त्यांची लाडकी मुलगी राहा देखील कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. राहाचा एक फोटो जरी समोर आला की, लगेच त्यावर कमेन्टचा वर्षाव केला जातो.

राहा ही आपले पंजोबा राज कपूर यांच्या सारखीच दिसते, असं चाहते म्हणतात. पहिल्यांदा जेव्हा राहा मीडियासमोर आली तेव्हा तिच्या सुंदर आणि आकर्षक डोळ्यांची खूपच तारीफ झाली. राहाचा आणि राज कपूर यांचा फोटो तेव्हा ट्रेंडमध्ये होता. आता राहा आणि तिची आई अर्थातच आलिया भट्ट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

आलियाने नुकतच मानसिक आरोग्यावर भाष्य केलं आहे. तिने म्हटलं की, मी गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक आठवड्याला मानसिक आरोग्यावर थेरेपी घेतेय आणि त्याचा माझा आयुष्यात मला बराच फायदा झाला असल्याचा आलिया सांगते.

काय म्हणाली आलिया भट्ट?

‘मी प्रत्येक आठवड्याला थेरेपी सेशनसाठी जाते. जेथे मी स्वतःला वाटणाऱ्या भीतीबद्दल बोलत असते. मनात असलेल्या भीतीचा सामना करते. ही गोष्ट तुमच्या लवकर लक्षात येत नाही… ही फार मोठी प्रोसेस आहे. तुम्ही स्वतःला रोज एक नवीन व्यक्ती बनवण्याचा प्रयत्न करता…’

मला कायम वाटायचं की, लोक माझ्याबद्दल काय विचार करतील? मी सर्वकाही योग्य प्रकारे सांभाळू शकते का? वास्तवात पाहायला गेलं तर कोणीच तुमच्याबद्दल विचार करत नाही. तरी देखील काही गोष्टींचा विचार आपण स्वतःच स्वतःसाठी करत असतो. त्यामुळे मी माझ्या मानसिक आरोग्यावर काम करत असतेय, असं आलिया (Alia Bhatt) म्हणाली आहे.

दरम्यान, आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास ती वकरच ‘जिगरा’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. वसन बाला या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. सप्टेंबर 2024 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. शिवाय, आलिया दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या ‘लव्ह अॅन्ड वॉर’ सिनेमात देखील मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

News Title : Alia Bhatt Talk On Changes After Daughter Rahas Birth

महत्त्वाच्या बातम्या –

महाराष्ट्रात काँग्रेसला धक्क्यावर धक्के; आणखी एका नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी

नारायण राणे सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा आला समोर

‘छत्रपती शिवरायांची क्षमा मागून…’; चिन्मय मांडलेकरने घेतला मोठा निर्णय

उष्माघाताची बातमी वाचताना अँकर स्वतःच कोसळली, Video होतोय व्हायरल

खडसेंच्या भाजप प्रवेशावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले ‘इच्छा नसतानाही…’