कमी बजेटमध्ये दमदार फीचर्ससह खरेदी ‘हा’ स्मार्टफोन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

POCO C61 Smartphone l तुम्ही बजेट फ्रेंडली आणि उत्तम फीचर्स असलेला फोन शोधत असाल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. POCO C61 स्मार्टफोन आजकाल फ्लिपकार्टवर मोठ्या सवलतीत उपलब्ध आहे. या फोनचा 128 जीबी स्टोरेज व्हेरियंट असलेला स्मार्टफोन केवळ 7,499 रुपयांना मिळत आहे.

POCO C61 स्मार्टफोन दोन स्टोरेज प्रकारांमध्ये उपलब्ध :

POCO C61 स्मार्टफोन दोन स्टोरेज प्रकारांमध्ये येत आहे. पहिला प्रकार 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजमध्ये येत आहे तर दुसरा प्रकार 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजमध्ये येत आहे. पहिला व्हेरियंटची किंमत 6 हजार 999 रुपये तर दुसऱ्या व्हेरिएंटची किंमत 7 हजार 499 रुपये आहे.

हा फोन डायमंड डस्ट ब्लॅक, इथर्नल ब्लू आणि मिस्टिकल ग्रीन कलरमध्ये उपल्बध आहे. याशिवाय तुम्ही या स्मार्टफोनसाठी फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक कार्डद्वारे पैसे भरल्यास तुम्हाला 5 टक्के कॅशबॅकचा लाभ मिळू शकतो. यावर ईएमआयचा पर्याय देखील दिला जात आहे.

POCO C61 Smartphone l POCO C61 स्पेसिफिकेशन :

POCO C61 फोनच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, या फोनमध्ये तुम्हाला 6.7 इंच LCD स्क्रीन, HD Plus रिझोल्यूशन, 90Hz रिफ्रेश रेट, 500 nits ची पीक ब्राइटनेस आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 मिळत आहे. या फोनच्या मागील बाजूस, तुम्हाला AI लेन्स आणि LED फ्लॅशसह 8MP कॅमेरा देखील देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 5MP फ्रंट कॅमेरा आहे.

याशिवाय फोनमध्ये प्रोसेसरसाठी MediaTek Helio G36 SoC चिपसेट उपलब्ध आहे. Poco चा हा फोन Android 14 वर आधारित OS वर काम करत आहे. या Poco फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 10W फास्ट चार्जिंग आणि USB Type-C चार्जिंग पोर्टसह येते.

या फोनमध्ये ड्युअल सिम 4G, Wi-Fi, ब्लूटूथ, GPS यांसारखी अनेक विशेष वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय सुरक्षेसाठी फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.

News Title- POCO C61 Smartphone

महत्त्वाच्या बातम्या-

शिंदे गटाचं टेंशन वाढलं, ‘या’ नेत्याच्या घोषणेमुळे छ. संभाजीनगर मतदारसंघात ट्विस्ट

74 वर्षीय वृद्ध महिलेच्या जिवाशी खेळ, दीड तासांनंतरही रूग्णवाहिका आली नाही, अखेर….

राखी सावंतला सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका!

लोकसभा निवडणूकीनंतर दोन्ही पवार एकत्र येणार का?, अजित दादांनी स्पष्टच सांगितलं

ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘या’ योजना ठरतायेत लाभदायक; मिळतोय भरघोस व्याजदर