पंकज त्रिपाठींच्या बहिणीच्या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल, पाहून अंगावर येईल काटा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

CCTV | बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्या कुटुंबावर शनिवारी दुःखाचा डोंगर कोसळला. धनबादमधील जीटी रोडवरील झालेल्या भीषण अपघातात अभिनेत्याचा मेहुणा राकेश तिवारी यांचं निधन झालं. तर बहीण सरिता तिवारी यांची प्रकृती चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजेश आणि सरिता बिहारच्या गोपालगंज येथून पश्चिम बंगालच्या चित्तरंजनला जात असताना दिल्ली-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग-2 जीटी रोडवर दुपारी साडेचार वाजता हा अपघात झाला.

पंकज त्रिपाठींच्या बहिणीचा अपघात

या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज (CCTV ) समोर आलं आहे. ज्यात हा भीषण अपघात कसा झाला ते दिसून येत आहे. पंकज त्रिपाठीचे भावोजी रस्त्यावर भरधाव वेगाने येत होते. त्याचवेळी त्यांची कार अचानक डिवाइडरवर धडकली.

अभिनेत्याचे भावोजी राकेश तिवारी कार चालवत असताना कारवरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हा अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी राकेश आणि सरिता यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं.

अपघाताचा व्हिडीओ समोर

मात्र, राकेश तिवारी यांना गंभीर इजा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी सरिता या गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पंकज त्रिपाठींच्या बहिणीचा पाय फ्रॅक्चर झाला असून सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार चालू आहेत. त्यांच्या जीवाला धोका नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

समोर आलेल्या फुटेजमध्ये (CCTV ) कारची स्थिती पाहता ती सुसाट वेगाने जात असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. राकेश तिवारी हे चितरंजन रेल्वेमध्ये काम करायचे. त्यांची ड्युटी रेल्वेच्या जीएम कार्यालयात होती. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे ते आपल्या घरी गोपालगंजला आले होते. मात्र काळाने त्यांचा घात केला.

News Title- CCTV footage of pankaj tripathi sister accident

महत्वाच्या बातम्या-

‘या’ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल

अरे व्हा! आता फुकटात आधारकार्ड अपडेट करता येणार; जाणून घ्या प्रोसेस

ट्विंकल खन्नाचे दाऊद इब्राहिमसोबत संबंध?, अखेर ट्विंकलने सोडलं मौन म्हणाली…

“ठाकरे सरकार भाजपच्या 4 बड्या नेत्यांना तुरुंगात पाठवणार होतं”, नव्या दाव्याने खळबळ

…तर एकनाथ शिंदेना जेलमध्ये टाकायचा प्लॅन; ‘या’ नेत्यानी केला गौप्यस्फोट