चिन्मय मांडलेकरच्या निर्णयाने दिग्पाल लांजेकरांचं नुकसान?, नव्या चित्रपटाबद्दल थेट बोलले…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chinmay Mandlekar | मनोरंजनसृष्टीमध्ये गेल्या सहा ऐतिहासिक पटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणारा मराठी अभिनेता, लेखक आणि निर्माता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत चपखल बसणारा अभिनेता म्हणून चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) कडे पाहिलं जातं. गेल्या अनेक चित्रपटांमध्ये चिन्मयने काम केलंय. मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेनं चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाला. मात्र आता चिन्मयने छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका करणार नसल्याचं सांगितलंय. (Chinmay Mandlekar)

चिन्मयच्या मुलाचं नाव जहांगीर असल्याने त्याला आणि त्याच्या कुटुंबाला चिन्मयची पत्नी नेहाच्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी नको त्या कमेंट्स केल्यात. यामुळे चिन्मय आणि त्याच्या कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागल्याचं त्याने सांगितलं आहे. त्याचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. त्याने आपल्या व्हिडीओतून माझ्या मुलाचा जन्म हा 2013 चा असल्याचं सांगितलं.

“मी आता छत्रपती शिवरायांची क्षमा मागून…”

महाराजांवर प्रचंड प्रेम आहे. हे मला सांगायची गरज नाही. तुम्ही आपल्या गाडीत गणपतीची मूर्ती ठेवता. तिथं मी महाराजांची छोटी मूर्ती ठेवतो असं चिन्मय म्हणाला. त्यानंतर मी आता छत्रपती शिवरायांची क्षमा मागून मी भूमिका करण्यापासून रजा घेत असल्याचं त्यांनी व्हिडीओतून सांगितलं. त्यानंतर आता चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी प्रतिक्रिया दिलीये.

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांची प्रतिक्रिया

चिन्मय मांडलेकर यांच्या भूमिकेनंतर आता दिग्पाल लांजेकर यांनी माध्यमांशी बोलत असताना प्रतिक्रिया दिली आहे. “चिन्मय यांच्याशी चर्चा नाही. फक्त जुजबी स्वरूपात मेसेजवर बोलणं झालं. मात्र हा निर्णय घेण्याआधी काहीच चर्चा झाली नाही. शिवराज अष्टक मंडळमधील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अद्यापही तेच करणार आहेत. आमच्यात चर्चा झाल्यानंतर अंतिम निष्पन्न होईल. सध्या मी काहीच बोलायला तयार नाही”, असं दिग्पाल लांजेकर म्हणालेत.

“या सर्व गोष्टींवर शिवराज अष्टक अवलंबून आहे. शिवराज अष्टक हा केवळ सिनेमाचा भाग नाही. तर लोकांच्या भावनेचा भाग आहे. त्यामध्ये प्रत्येकाला सहभागी व्हावं लागेल. कारण चिन्मय यांच्याशी बोलल्याशिवाय काहीही बोलण चुकीचं ठरेलं,” असं दिग्पाल लांजेकर म्हणालेत.

News Title – Chinmay Mandlekar Take Decision About Shivaji Maharaj Role After Digpal Lanjekar Statement

महत्त्वाच्या बातम्या

“लय फडफड करत होता, हिमालयात जाऊन झोपला का काय?”

रितेश देशमुख सहकुटुंब पोहोचला अयोध्येत, म्हणाला ‘हे माझं…’

या दुर्मिळ योगायोगाने साजरी होणार हनुमान जयंती, जाणून घ्या पुजेची वेळ व पद्धत

पंकज त्रिपाठींच्या बहिणीच्या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल, पाहून अंगावर येईल काटा

कमी बजेटमध्ये दमदार फीचर्ससह खरेदी ‘हा’ स्मार्टफोन