रितेश देशमुख सहकुटुंब पोहोचला अयोध्येत, म्हणाला ‘हे माझं…’

Ritesh Deshmukh | बॉलिवूडचं सर्वात बेस्ट कपल म्हणजे अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख. रितेश देशमुख आणि जिनिलिया आपल्या कुटुंबासह आयोध्येला प्रभू श्रीरामाच्या चरणी लीन झाले आहेत. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ते नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असून कोणत्या न् कोणत्या कारणाने चर्चेत असतात. मात्र आता रामलल्लाच्या दर्शनाला गेल्याने ते अधिक चर्चेत आलेत.

रितेश आणि जिनिलियाला दोन मुलं आहेत. ते देखील रामलल्लाच्या चरणी आपल्या आई-वडिलांसोबत दर्शन घेताना दिसत आहेत. 20 मिनिटं ते मंदिरात होते. दरम्यान, 22 जानेवारी रोजी प्रभू श्री रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला आहे. यावेळी अनेक निमंत्रित दिग्गजांनी हजेरी लावली होती. त्यानंतर हजारो भक्तगण राम लल्लाच्या दर्शनाला येत आहेत. अशातच बॉलिवूडचं चर्चेत असलेलं रितेश आणि जिनिलिया हे जोडपं रामलल्लाच्या दर्शनासाठी गेले होते. त्यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतेय. (Ritesh Deshmukh)

पोस्ट व्हायरल

पत्नी आणि मुलासह रितेश देशमुख रामलल्लाच्या दर्शनाला गेला. त्यांच्या फोटोची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. यावेळी त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. “तेव्हा मंत्रो से बडकर तेरा नाम…जय श्रीराम! रामलल्लाचं दर्शन झालं हे माझं भाग्यच”, असल्याचं रितेशने म्हटलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

 

रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) लखनऊमध्ये आयपीएल पाहण्यासाठी गेला होता. त्यावेळी तो कुटुंबासोबत आयोध्येला गेला. प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतल्यानंतर देशमुख कुटुंब पुन्हा मुंबईकडे परतले.

रितेश आणि जिनिलियाच्या मुलांवर संस्कार

दरम्यान, देशमुख कुटुंबाची राज्यातच नाहीतर देशात चर्चा आहे. खासकरून त्यांच्या मुलांच्या संस्काराबाबत अनेकजण कौतुक करतात. रितेश देशमुखची (Ritesh Deshmukh) दोन्ही मुलं नेहमी प्रत्येक व्यक्तीला हात जोडून नमस्कार करत आदर देतात. त्यांना आध्यात्माची ओढ असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे.

रितेश आणि जिनिलिया यांच्या रिल्सची चर्चा आहे. सर्वसामान्य कुटुंबातील जोडप्यांची असलेली मानसिकता, नवरा-बायको यांच्यातील भांडणं हे त्या रिल्सच्या माध्यमातून मांडत असतात. त्या अधिक स्वरूपात पाहिल्या देखील जातात.

News Title – Ritesh Deshmukh And His Family Took Darshan At Ayodya Prabhu Shree Ram

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईचा आज राजस्थान रॉयल्सशी सामना, कोण मारणार बाजी?

‘या’ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल

अरे व्हा! आता फुकटात आधारकार्ड अपडेट करता येणार; जाणून घ्या प्रोसेस

ट्विंकल खन्नाचे दाऊद इब्राहिमसोबत संबंध?, अखेर ट्विंकलने सोडलं मौन म्हणाली…

“ठाकरे सरकार भाजपच्या 4 बड्या नेत्यांना तुरुंगात पाठवणार होतं”, नव्या दाव्याने खळबळ