“लय फडफड करत होता, हिमालयात जाऊन झोपला का काय?”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange Patil | नाशिकच्या लोकसभा निवडणुकीतून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी माघार घेतली आहे. यावर बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर टीका केली आहे. लयं फडफड करत होता, स्वतःलाच मोठा समजत होता कुठं गेला कायं माहिती?, असं म्हणत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी छगन भुजबळांवर निशाणा साधला आहे.

जरांगेंनी भुजबळांना सुनावलं.

भोरमध्ये एका कार्यक्रमाच्या ठिकाणी भाषण करत असताना मनोज जरांगे यांच्या पायाजवळ अचानक सापसुरळी आली. त्यानंतर याचा आधार घेत येवल्यावरून आली का काय?, असं म्हणत मनोज जरांगेंनी छगन भुजबळांना सुनावलं.

मी सगळे तुमच्या ताकदीवर नीट केलेले आहेत. पहिल्यांदा आपली जात एकत्र नव्हती. त्याचा पुरेपूर फायदा त्यांनी उचलला. आपला छळ केला. पण आता समाज एक झालाय. लोकसभा निवडणुकीत कुणाला ना पाडा म्हटले, ना कुणाला निवडून आणा म्हटलेयं. तुम्हाला पाडायच आहे, त्यांना पाडा, पण पाडताना एवढ्या ताकदीने पाडा की त्यांच्या पुढच्या पाच पिढ्यांना उभे राहता येणार नाही, असं मनोज जरांगेंनी (Manoj Jarange Patil) म्हटलंय.

जर आरक्षण नाही दिलं, तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मराठा समाज 100 टक्के मैदानात उतरणारं आहेस असंही मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.

8 जूनला होणार सभा

मनोज जरांगे पाटील 8 जूनला होणाऱ्या सभेबाबत माहिती दिली. त्यांनी म्हटले की, त्या ठिकाणी 1700 एकर जमीन आहे. त्यातली 900 एकर जमिनीची साफसफाई होत आहे. येत्या एक तारखेपासून त्याचे कामं अधिक वेगाने सुरू होणारं आहे.

नारायणगडाच्या पायथ्याशी शेकडो गावांची जवळपास 2 हजार हेक्टर जमीन आहे, पार्किंगची व्यवस्था व्हावी यासाठी शेतकरी त्याचे बांधसुद्धा मोडणार आहेत. राज्यातील 6 कोटी मराठा समाज त्याठिकाणी येणार आहे. गावागावात त्याची जागृती लोकांनी सुरू केलेली आहे. एकही मराठा त्यादिवशी घरी राहणार नाही, असंही ते म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

रितेश देशमुख सहकुटुंब पोहोचला अयोध्येत, म्हणाला ‘हे माझं…’

या दुर्मिळ योगायोगाने साजरी होणार हनुमान जयंती, जाणून घ्या पुजेची वेळ व पद्धत

पंकज त्रिपाठींच्या बहिणीच्या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल, पाहून अंगावर येईल काटा

कमी बजेटमध्ये दमदार फीचर्ससह खरेदी ‘हा’ स्मार्टफोन

राहाच्या जन्मानंतर आलिया करतेय ‘या’ गोष्टीचा सामना, म्हणाली..