‘त्यात एवढी मिरची लागायचं कारण नाही’, राऊतांचा नाना पटोलेंवर पलटवार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sanjay Raut | महाविकास आघाडीमधील ठाकरे गटाचे नेते संजय राऊत नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. अशात मविआमधीलच नेत्याने राऊत यांच्यावर निशाणा साधत टोलेबाजी केली आहे. त्याला संजय राऊत यांनीही पलटवार करत सणसणीत प्रत्युत्तर दिलंय.

झालं असं की, संजय राऊतांनी पंतप्रधानपदाच्या दावेदारीमध्ये उद्धव ठाकरेंचं नाव पुढे केलं, यावर नाना पटोले यांनी संजय राऊतांवर टीका करत त्यांच्या बोलण्याला इतकं महत्व देऊ नका असं म्हटलं होतं. यावरच संजय राऊत यांनी आज (22 एप्रिल) प्रत्युत्तर दिलं आहे. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते.

राऊत-पटोले यांच्यात शाब्दिक वाद

‘हा पंतप्रधानपदाचा वाद नाही. आम्ही काय बोलतोय हे काँग्रेसला समजत नाहीये. राहुल गांधी हे मोठे नेते आहेत. ते देशाचे नेते आहेत. जर राहुल गांधींना पंतप्रधान बनायचं असेल तर त्याचं आम्ही स्वागत करतो. पण देशात अजूनही चेहेरे आहेत. ममताजी आहेत, अखिलेश आहेत, उद्धव ठाकरे आहेत. आणखी बरेच चेहरे आहेत. खरगे आहेत. कुणाचं नाव घेणं गुन्हा आहे का?’, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

तसंच पुढे ते म्हणाले की, आमच्या पक्षाच्या नेत्याचं नाव आम्ही घेतलं, तर त्यात चूक काय? कुणाला एवढी मिरची लागण्याचं कारण नाही. असा टोला संजय राऊत यांनी नाना पटोले यांना लगावला. सध्या पटोले आणि  राऊत (Sanjay Raut) यांच्यात शाब्दिक वाद सुरू असल्याचं दिसून येतंय.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते?

पंतप्रधानपदाच्या दावेदारीबाबत बोलताना संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंचं नाव घेत मोठं वक्तव्य केलं होत. ‘अंतर्गत राजकारणामुळे शरद पवारांसारखा नेता, त्यांचं कतृत्व असतानाही त्यांना संधी मिळाली नाही, याचं आम्हाला वाईट वाटतं. उद्धव ठाकरेंना ही संधी मिळाली तर शरद पवार यांच्यासह देशातले अनेक प्रमुख नेते उद्धव ठाकरेंना पसंती देतील. महाराष्ट्रात त्यांनी मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केलं आहे. कोरोना काळात एक राज्य सांभाळलं आहे.’, असं राऊत (Sanjay Raut) म्हणाले होते.

नाना पटोले नेमकं काय म्हणाले होते?

‘संजय राऊत रोज आपली स्टेटमेंट बदलतात, त्यामुळे संजय राऊतांच्या स्टेटमेंटला फार काही व्हॅल्यू देऊ नका. कालपर्यंत राहुल गांधींना प्रधानमंत्री बनवायला निघाले, आज त्यांना उद्धव ठाकरे दिसत आहेत, त्यामुळे याच्यावर फार लक्ष घालू नका.’, असं नाना पटोले म्हणाले होते.

News Title- Sanjay Raut on Nana Patole

महत्त्वाच्या बातम्या- 

राखी सावंतला सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका!

लोकसभा निवडणूकीनंतर दोन्ही पवार एकत्र येणार का?, अजित दादांनी स्पष्टच सांगितलं

ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘या’ योजना ठरतायेत लाभदायक; मिळतोय भरघोस व्याजदर

राज्यात ‘या’ भागांना वीजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा इशारा

मुंबईचा आज राजस्थान रॉयल्सशी सामना, कोण मारणार बाजी?