माढ्यातील कापड व्यापाऱ्याचं भाकीत समोर, गेल्यावेळचा अंदाज ठरलेला खरा, आता म्हणतात…

Maharashtra Loksabha Election

Maharashtra Loksabha Election | लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला आहे. अशात राज्यातील जनतेचं काही महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघाकडे लक्ष लागलं आहे. तसेच मोदी 400 पारचा नारा देत आहेत. मात्र ते 400 हून कमी जागा जिंकतील असं भाकित माढ्यातील कापड व्यवसायिकाने वर्तवलं आहे. विशाल शहा असं त्यांचं नाव असून एक्झिटपोलही त्यांच्यासमोर फेल असल्याचं समजतंय. (Maharashtra Loksabha Election)

कारण आतापर्यंत त्यांनी निवडणुकीच्या मतदारसंघात नेमका कोणाचा विजय होईल याबाबत भाकीत केलं आणि त्यांचं ते भाकीत खरंही ठरलं आहे. एनडीए आणि इंडिया आघाडी अशी राष्ट्रीय पातळीवर लढत आहे. विशाल यांनी नुकताच 20 एप्रिलला एनडीए आणि इंडिया आघाडीच्या निकालाचा अंदाज जाहीर केला. त्यावेळी त्यांनी एनडीए 389 जागा जिंकतील आणि मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असं म्हटलंय. (Maharashtra Loksabha Election)

विशाल शहासमोर एक्झिट पोल फेल

माढ्यातील विशाल शहा यांनी आतापर्यंत अनेक अंदाज वर्तवले होते ते अंदाज खरे ठरले आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार असल्याचं सांगितलं. गेल्या निवडणुकीत त्यांनी भाजपला 307 आणि एनडीएला 350 जागांचा अंदाज वर्तवला होता. त्यावेळी सर्व एक्झिट पोलचे अंदाज चुकले होते. मात्र त्यावेळी विशाल शहा यांचा अंदाज निकालावेळी 99.24 टक्के तंतोतंत जुळला होता. (Maharashtra Loksabha Election)

शनिवारी म्हणजे 20 एप्रिल 2024 रोजी भाजपला 334 तर सहयोगी पक्षाला 55 जागा मिळतील असं भाकीत केलं होतं. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. 400 पारचा नारा देत असला तरीही एनडीएच्या पारड्यात 389 जागा असतील, अशी फेसबूक पोस्ट त्यांनी शेअर केलीये. (Maharashtra Loksabha Election)

बारामती आणि साताऱ्यात महायुती जिंकणार

यावेळी विशाल शहा यांनी सोलापूर आणि माढा या दोन्ही जागा भाजप जिंकेल असा अंदाज लावलाय. या दोन्ही मतदारसंघात चुरशीची लढत होणार असल्याचा विशाल शहा यांनी अंदाज वर्तवलाय. त्यानंतर बारामती आणि साताऱा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून येतील सांगितलं आहे. म्हणजेच साताऱ्यातून उदयनराजे भोसले तर बारामती येथे अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार जिंकून येतील, असा अंदाज विशाल शहा यांनी लावला आहे.

News Title – Maharashtra Loksabha Election In Vishal Shah Against All Exit Poll Fail

महत्त्वाच्या बातम्या

‘छत्रपती शिवरायांची क्षमा मागून…’; चिन्मय मांडलेकरने घेतला मोठा निर्णय

उष्माघाताची बातमी वाचताना अँकर स्वतःच कोसळली, Video होतोय व्हायरल

खडसेंच्या भाजप प्रवेशावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले ‘इच्छा नसतानाही…’

“…म्हणून फडणवीसांचे पंख छाटण्यात आले अन् त्यांना उपमुख्यमंत्री केलं”

‘रश्मी ठाकरे फक्त दिसतात भोळ्या त्या…’; ‘या’ नेत्याच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .