मोठी बातमी! भाजपच्या नव्या प्रस्तावाने एकनाथ शिंदेंचं टेंशन वाढलं

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Nashik Loksabha | लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान पूर्ण झालं आहे. आता दुसऱ्या टप्प्यासाठी प्रचारसभा सुरू आहेत. पण महायुतीमधील जागावाटपाचा तिढा कायम आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या जागेवरील दावा सोडला आहे. मात्र भुजबळांनी माघार घेऊन देखील नाशिकच्या जागेचा तिढा सुटला नाही. अशात नाशिकच्या जागेबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

एकनाथ शिंदेंचं टेंशन वाढलं

भाजपने शिवसेनेला दिलेल्या प्रस्तावाने शिंदेंचं टेंशन वाढलं आहे. ठाण्याच्या बदल्यात नाशिकची (Nashik Loksabha) जागा भाजपला द्या, असा नवा प्रस्ताव भाजपने सेनेला दिल्याची चर्चा आहे. या प्रस्तावामुळे हा तिढा अधिक वाढला आहे.

भाजपचा शिवसेनेला नवा प्रस्ताव

नाशिकची जागा हवी असेल तर ठाण्याची जागा द्या आणि जर ठाण्याची जागा हवी असेल तर नाशिकची जागा द्या, असा प्रस्ताव भाजपने दिल्याची माहिती समोर आलीये. भाजपने कोणताही दावा केला तरी नाशिकची जागा ही शिवसेनेचीच असेल, अशी भूमिका शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली आहे.

दरम्यान, शिंदेसेनेकडून खासदार हेमंत गोडसे, अजय बोरस्ते यांची नावं चर्चेत आहेत. गोडसे यांच्याविरोधात वातावरण असल्याचं भाजपचे सर्व्हे सांगतात. त्यामुळे भाजप त्यांच्या नावाबद्दल अनुकूल नाही. त्यामुळे पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे ग्राऊंड रिपोर्ट घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. दुसरीकडे अजय बोरस्ते यांच्या नावाबद्दल भाजप अनुकूल असल्याचं बोललं जातंय. यावर शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिलीये.

नाशिक लोकसभेची (Nashik Loksabha) निवडणूक ही शेवटच्या टप्प्यात असल्याने ही जागा जाहीर करण्यासाठी उशीर होत आहे, मात्र लवकरच ही जागा जाहीर केली जाईल. कुठलीही ऑफर किंवा तडजोड या जागेबाबत होणार नाही. शिवाय येत्या दोन दिवसात या जागेवरचा उमेदवार देखील जाहीर होईल अशी, माहिती संजय शिरसाट यांनी दिली आहे.

निवडणुकीला अवघा 30 दिवसांचा वेळ शिल्लक असताना जाहीर होत नसल्याने महायुतीला त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्वतः छगन भुजबळ यांनीही उमेदवारी लवकर जाहीर करा, अन्यथा नाशिक लोकसभेच्या जागेसाठी वेळ कमी पडला म्हणून महायुतीच्या उमेदवाराला त्याचा फटका बसू शकतो, अशी शक्यता वर्तवत माघार घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

माढ्यातील कापड व्यापाऱ्याचं भाकीत समोर, गेल्यावेळचा अंदाज ठरलेला खरा, आता म्हणतात…

“लय फडफड करत होता, हिमालयात जाऊन झोपला का काय?”

रितेश देशमुख सहकुटुंब पोहोचला अयोध्येत, म्हणाला ‘हे माझं…’

या दुर्मिळ योगायोगाने साजरी होणार हनुमान जयंती, जाणून घ्या पुजेची वेळ व पद्धत

पंकज त्रिपाठींच्या बहिणीच्या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल, पाहून अंगावर येईल काटा