बॉलीवूड कलाकार चक्क अंत्यदर्शनाला जाण्यासाठीही घेतात पैसे, अभिनेत्याचा मोठा खुलासा

Bollywood Actors take money to attend funerals said Anuj Sawhney

Anuj Sawhney | बॉलीवूडच्या झगमगत्या जगात अनेक कहाण्या दडलेल्या आहेत. या स्वप्ननगरीत प्रवेश करणं दिसतं तेवढं सोप्पं नाही. अनेक दिग्गज कलाकारांनी आपला स्ट्रगल सांगितला आहे. परिवारवाद इथेही अपवाद नाही. त्यामुळे स्वतःचं नाव कमवायचं झाल्यास इथे लढाई फार मोठी आहे. त्यात अभिनेत्रींच्या वाट्याला तर कोणते अनुभव येतील काही सांगता येत नाही.

बऱ्याच अभिनेत्रींनी कटू सत्य सांगितलं आहे. त्यांच्याकडे सिनेमात काम करण्यासाठी काय-काय मागणी करण्यात आली याबाबत अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. अशात या मायानगरीसंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे.

अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

एकदा काय बॉलीवूडमध्ये पाय ठेवला की इथे नशीब उजळतं असं म्हटलं जातं. त्यात अभिनेते-अभिनेत्री यांना मिळणारी प्रसिद्धी वेगळी. ही कलाकार मंडळी एक सिनेमा करुन लाखो आणि कोटी रुपये कमावतात. पण वर्षाला 1-2 सिनेमे करुन ते थांबत नाहीत. सिनेमांशिवाय ब्रँड एंडोर्समेंट, प्रमोशन्स, मॉडेलिंग सारख्या अनेक माध्यमातून ते पैसे कमावत असतात.

त्यात मग दिग्गज व्यावसायिक असो किंवा बड्या नेत्याच्या लग्नात जाणं. तसंच तिथे जर परफॉर्मन्स केला तर हे कलाकार लाखो रुपये फिस घेतात. अशा अनेक इव्हेंट्सद्वारे ही मंडळी पैसा कमावते. पण, एका अभिनेत्याने केलेला खुलासा ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. अभिनेता अनुज सोव्हनी (Anuj Sawhney) याने एक धक्कादायक सत्य सर्वांसमोर आणलं आहे.

अंत्यसंस्काराला जाण्याचे रेट ठरलेले असतात

बॉलिवूड कलाकारांना पैसे कमावण्याची ही इतकीच साधने नसून आणखी एका माध्यमातून ते पैसे कमावतात जे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. अभिनेता अनुज सोव्हनी याने इंडस्ट्रीबाबतची ही काळी बाजू सर्वांसमोर आणली आहे. ब्रँड इंडोर्समेंट, लग्न समारंभ, इव्हेंट्स यांच्याबरोबर कलाकार एखाद्याच्या अत्यंसंस्काराला जाण्यासाठीही पैसे घेतात असं त्यानं म्हटलं आहे. एका शोमध्ये त्याने हा खुलासा केला आहे.

“एका मोठ्या स्टारची कमाई ही लग्नसमारंभातून होते. त्याचप्रमाणे कोणाच्याही अंत्यसंस्कारासाठी आणि तेराव्याला उपस्थित राहण्यासाठीही बॉलिवूड कलाकार पैसे घेतात”, असं अभिनेत्याने म्हटलं आहे. “ही गोष्ट अनेकांना माहिती नाहीये. कुणी याचा आतापर्यंत विचारही केला नसेल. पण हे खरं आहे”, असंही तो म्हणाला आहे. अंत्यसंस्कार आणि तेराव्याला किती पैसे घ्यायचे यासाठी त्यांचे काही रेट्स ठरलेले असतात, असा खुलासा अभिनेत्याने (Anuj Sawhney) केला आहे.

News Title- Bollywood Actors take money to attend funerals said Anuj Sawhney

महत्वाच्या बातम्या-

भाजपच्या नव्या प्रस्तावाने एकनाथ शिंदेंचं टेंशन वाढलं, ‘त्या जागेचा

माढ्यातील कापड व्यापाऱ्याचं भाकीत समोर, गेल्यावेळचा अंदाज ठरलेला खरा, आता म्हणतात…

“लय फडफड करत होता, हिमालयात जाऊन झोपला का काय?”

रितेश देशमुख सहकुटुंब पोहोचला अयोध्येत, म्हणाला ‘हे माझं…’

या दुर्मिळ योगायोगाने साजरी होणार हनुमान जयंती, जाणून घ्या पुजेची वेळ व पद्धत

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .