पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune News | राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पुणे, मुंबई या सारख्या अन्य शहरात तापमानाने 40 % पार केलं आहे. मात्र, काही भागात पावसाने हजेरी लावल्यामुळे मागील दोन दिवस नागरिकांना दिलासा मिळाला होता. दरम्यान एकीकडे उन्हाच्या झळा लागत असताना दुसरीकडे पुणेकरांसमोर पाणी टंचाईचा प्रश्न उपस्थित झाला आहे. पुण्याच्या धरणातील पाणीसाठ्याने अक्षरशः तळ गाठला आहे. त्यामुळे पुणेकरांनी जपून पाणी वापरावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी

पुण्याच्या (Pune News) धरणात पाणी कमी झाल्यामुळे पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे पुणेकरांना येत्या दोन महिन्यात म्हणजेच मे आणि जूनमध्ये पाणी टंचाईचा तिव्र सामना करवा लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एवढंच नाही तर, पुण्यात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पालिकेकडून काही नियम देखील जारी करण्यात आले आहेत.

पुण्यात (Pune News) शहराला पाणी पुरवठा करण्याऱ्या धरणात पाणी झपाट्याने कमी झालं आहे. खडकवासला या धरणातलं पाणी तळाला गाठलं आहे. त्यामुळे सध्या खडकवासला धरणात दीड महिना पुरेल एवढंच पाणीसाठा शिल्लक राहीला आहे.

किती पाणीसाठा उपलब्ध?

मे आणि जून या महिन्यात पुणेकरांना पाणी टणचाई करावी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धरणात सध्या उपलब्ध साठा 9.43 टीएमसी इतका आहे. त्यामुळे पिण्यासाठी 6 टीएमसी पाणी उपलब्ध असणार आहे. मागील वर्षी कमी पाऊस पडल्याने आणि यंदा भीषण उकाडा यामुळे धरणांमध्ये कमी पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यातील शेतीसाठीचे एक आवर्तन आहे. त्यामुळं पिण्याचे पाणी फक्त 6 टीएमसी इतकं शिल्लक आहे.

उजनी धरणातील पाणी तळाला?

खडकवासला धरणाबरोबरच उजनी धरणीतल पाणीसाठा देखील कमी झाला आगे. उजनी धरणातील पाणीपातळीमध्ये देखील घट झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पुणे, इंदापूर तालुक्याच्या काही भागातील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. भीमा नदीपात्रही कोरडे ठाक पडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

News Title : pune news water crisis in pune city

महत्त्वाच्या बातम्या-

ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटील यांना निवडणूक आयोगाचा झटका!

चिन्मय मांडलेकरच्या निर्णयाने दिग्पाल लांजेकरांचं नुकसान?, नव्या चित्रपटाबद्दल थेट बोलले…

‘पूर्ण बरे होऊनच परत या…’; ‘या’ नेत्याने भरला संजय राऊतांचा मनोरूग्णालयाचा फॉर्म

‘देशात मोदींच्या रुपाने नवीन पुतीन तयार होतोय…’; शरद पवारांची मोदींवर टीका

लोकसभा निवडणुकीचा पहिला निकाल बिनविरोध, भाजपचे दलाल विजयी!