लोकसभा निवडणुकीचा पहिला निकाल बिनविरोध, भाजपचे दलाल विजयी!

BJP

BJP | लोकसभा निवडणुकीमुळे सध्या देशात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सगळेच पक्ष जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. तर सत्ताधारी भाजप (BJP) आम्ही या निवडणुकीत 400 पेक्षा अधिक जागा जिंकू असा विश्वास व्यक्त करत आहे. दरम्यान संपूर्ण निकालाला अद्याप वेळ असला तरी भाजपला (BJP) एका जागेवर विजय मिळाला आहे. म्हणजेच भाजपने विजयाचं खातं खोललं आहे.

लोकसभा निवडणुकीचा पहिला निकाल बिनविरोध

गुजरातमधील सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल मतदानापूर्वीच बिनविरोध विजयी झाल्याचं घोषित करण्यात आलं आहे. याचं कारण म्हणजे आज आठही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. सुरत लोकसभा जागेबाबत गेल्या दोन-तीन दिवसांपासून हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता, जो आज संपला आहे.

काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांच्या फॉर्मवर भाजपकडून (BJP) आक्षेप नोंदवण्यात आला होता आणि त्यासंदर्भात काल म्हणजेच रविवारी सुनावणी होऊन काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज अवैध आणि रद्द ठरवण्यात आला.

सुरतमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा

या जागेवर एकूण 10 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले होते, त्यानंतर काँग्रेस उमेदवाराचा अर्ज रद्द झाला असून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांच्या विरोधात एकूण आठ उमेदवार होते. आता त्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजप उमेदवाराचा विजय निश्चित आहे.

सुरत मतदारसंघातून अपक्ष आणि इतर पक्षांच्या उमेदवारांनी आधीच आपली नावे मागे घेतली होती. यानंतर भाजपचे मुकेश दलाल आणि बसपचे प्यारेलाल हे दोनच उमेदवार राहिले. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान बसपचे उमेदवार प्यारेलाल यांनी आपला फॉर्म मागे घेतला, तर भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांना या जागेवर बिनविरोध विजयी घोषित करण्यात आलं आहे. त्याची अधिकृत घोषणाही करण्यात आली आहे.

दलाल यांच्या विजयाची सुरतच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घोषणा केली आहे. विशेष म्हणजे त्यांना खासदारकीचे पत्रही देण्यात आले आहे. अन्य सर्व उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता दलाल प्रत्यक्ष निवडणूक न लढवताच खासदार झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘पाच वर्षांपूर्वी मी मोठी चूक केली…’, शरद पवारांची जाहीर कबूली

बॉलीवूड कलाकार चक्क अंत्यदर्शनाला जाण्यासाठीही घेतात पैसे, अभिनेत्याचा मोठा खुलासा

मोठी बातमी! भाजपच्या नव्या प्रस्तावाने एकनाथ शिंदेंचं टेंशन वाढलं

माढ्यातील कापड व्यापाऱ्याचं भाकीत समोर, गेल्यावेळचा अंदाज ठरलेला खरा, आता म्हणतात…

‘त्यात एवढी मिरची लागायचं कारण नाही’, राऊतांचा नाना पटोलेंवर पलटवार

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .