‘पाच वर्षांपूर्वी मी मोठी चूक केली…’, शरद पवारांची जाहीर कबूली

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sharad Pawar | अमरावती लोकसभा मतदारसंघ सध्या चर्चेत आला आहे. येथे महायुतीकडून नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महायुतीमध्ये असूनही आमदार बच्चू कडू यांनी दिनेश बुब यांना उमेदवारी देत राणा यांना आव्हान दिलं आहे. महाविकास आघाडीकडून बळवंत वानखडे यांना येथे उमेदवारी देण्यात आलीये.

अमरावतीमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. याच सभेत पवार यांनी नाव न घेता महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधलाय. ‘पाच वर्षांपूर्वी मी एक चूक केली होती. मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे.’, असं म्हणत पवारांनी नवनीत राणा यांच्यावर टीका केली.

काय म्हणाले शरद पवार?

‘मला माझी जुनी चूक सुधारायची आहे. मागच्या वेळी एक चूक माझ्याकडून झाली अन् नवनीत राणा यांना पाठिंबा दिला. आता ती चूक कधी होणार नाही. ती चूक दुरुस्त करणार आहे. आता बळवंत वानखडे यांना विजयी करा, हे सांगायला मी आलो आहे’, असं शरद पवार म्हणाले आहेत.

‘मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे. माझ्याकडून एक चूक झाली. पाच वर्षापूर्वी जी निवडणूक झाली, तेव्हा त्या निवडणुकीतील उमेदवाराला मतदान करा म्हणून मी जाहीर सभा घेतल्या. लोकांनी माझा संदेश स्वीकारला आणि त्यांना पाठिंबा दिला, खासदार केलं. पण गेल्या पाच वर्षांतील त्यांचा अनुभव पाहिल्यावर माझ्या मनात अस्वस्थता होती. कधी तरी जावं आणि अमरावतीकरांना सांगावं आमच्याकडून चूक झाली.’, असं भाषणात पवार (Sharad Pawar) म्हणाले आहेत.

मोदींना फक्त नेहरू आणि काँग्रेस दिसते- शरद पवार

यावेळी पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. दहा वर्षे झाली, देशाची सत्ता नरेंद्र मोदी यांच्या हातात आहे. गेल्या 56 वर्षांत अनेकांना मी जवळून पाहिलंय. इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी.व्ही. नरसिंह राव, मनमोहन सिंग यांच्यासोबत काम केलं. या सर्वांच्या कामाची पद्धत पाहिली आहे, असंही पवारांनी सांगितलं.

ती लोक देशाच्या कानाकोपऱ्यात जायचे. भाषणं करायचे. नवा भारत कसा उभा राहील, लोकांचा आत्मविश्वास कसा वाढेल याचं काम ते करायचे. आजचे पंतप्रधान कुठेही गेल्यानंतर पहिल्यांदा नेहरूंवर टीका करतील. काँग्रेसवर टीका करतील, असा टोला शरद पवार (Sharad Pawar)  यांनी मोदींना लगावला.

News Title : Sharad Pawar Criticized Navneet Rana

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! भाजपच्या नव्या प्रस्तावाने एकनाथ शिंदेंचं टेंशन वाढलं

माढ्यातील कापड व्यापाऱ्याचं भाकीत समोर, गेल्यावेळचा अंदाज ठरलेला खरा, आता म्हणतात…

“लय फडफड करत होता, हिमालयात जाऊन झोपला का काय?”

रितेश देशमुख सहकुटुंब पोहोचला अयोध्येत, म्हणाला ‘हे माझं…’

या दुर्मिळ योगायोगाने साजरी होणार हनुमान जयंती, जाणून घ्या पुजेची वेळ व पद्धत