‘देशात मोदींच्या रुपाने नवीन पुतीन तयार होतोय…’; शरद पवारांची मोदींवर टीका

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे नेते महायुतीच्या विरोधात प्रचार करत आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ आज अमरावतीत शरद पवार (Sharad Pawar) यांची जाहीर सभा झाली. या सभेत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.

शरद पवारांची मोदींवर टीका

भाजपकडे दर मंगळवारी बैठक असते. तिथे चर्चा होत नाही. कुणीही बोलत नाही. फक्त तिथे मोदी बोलतात आणि निघून जातात. कुणालाही बोलता येत नाही. आज देशात मोदींच्या रुपाने नवीन पुतीन तयार होतो की काय ही चिंता आहे, असं म्हणत शरद पवारांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

राज्यसभा आणि लोकसभेचे सदस्य त्या ठिकाणी येतात. सर्व पक्षाचे सदस्य येतात. गप्पा मारतात. तिथे पक्षीय अंतर कोणी आणत नाही. पण आम्ही पाहतो, मोदी तिथून जात असल्यावर सत्ताधारी खासदार मान खाली घालतात. मोदींना दिसू नये म्हणून. इतकी दहशत आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा सत्ता द्यायची का?, असं शरद पवार म्हणालेत.

काय म्हणाले Sharad Pawar?

दहा वर्षे झाली, देशाची सत्ता नरेंद्र मोदी यांच्या हातात आहे. गेल्या 56 वर्षांत अनेकांना मी जवळून पाहिलंय. इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी.व्ही. नरसिंह राव, मनमोहन सिंग यांच्यासोबत काम केलं. या सर्वांच्या कामाची पद्धत पाहिली आहे, असंही पवारांनी सांगितलं.

ती लोक देशाच्या कानाकोपऱ्यात जायचे. भाषणं करायचे. नवा भारत कसा उभा राहील, लोकांचा आत्मविश्वास कसा वाढेल याचं काम ते करायचे. आजचे पंतप्रधान कुठेही गेल्यानंतर पहिल्यांदा नेहरूंवर टीका करतील. काँग्रेसवर टीका करतील, असा टोला शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोदींना लगावला.

मला माझी जुनी चूक सुधारायची आहे. मागच्या वेळी एक चूक माझ्याकडून झाली अन् नवनीत राणा यांना पाठिंबा दिला. आता ती चूक कधी होणार नाही. ती चूक दुरुस्त करणार आहे. आता बळवंत वानखडे यांना विजयी करा, हे सांगायला मी आलो आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

लोकसभा निवडणुकीचा पहिला निकाल बिनविरोध, भाजपचे दलाल विजयी!

‘पाच वर्षांपूर्वी मी मोठी चूक केली…’, शरद पवारांची जाहीर कबूली

बॉलीवूड कलाकार चक्क अंत्यदर्शनाला जाण्यासाठीही घेतात पैसे, अभिनेत्याचा मोठा खुलासा

मोठी बातमी! भाजपच्या नव्या प्रस्तावाने एकनाथ शिंदेंचं टेंशन वाढलं

माढ्यातील कापड व्यापाऱ्याचं भाकीत समोर, गेल्यावेळचा अंदाज ठरलेला खरा, आता म्हणतात…