ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटील यांना निवडणूक आयोगाचा झटका!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Omraje Vs Archana  Patil | धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये प्राचाराने जोर धरला आहे. अशातच आता मोठी बातमी समोर आलीये. धाराशिव लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. तर महायुतीच्या उमेदवार भाजप नेते राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. (Omraje Vs Archana  Patil)

एका सभेमध्ये प्रचारा वेळी बोलत असताना ते म्हणाले की सरकारने तेरणा हॉस्पिटलने रूग्णांवर उपचार करण्यासाठी 18 कोटी रूपये घेतले असा आरोप राणा जगजितसिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्यावर केला. तर उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी 500-1000 रूपये देऊन गर्दी करण्यात आल्याचा दावा ओमराजे यांनी केला. हा आरोप चुकीचा असल्याचं सांगत अर्चना पाटील यांनी ओमराजे यांची तक्रार केली. (Omraje Vs Archana Patil)

पुरावे जमा करा

या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी नोटीस जारी केली आहे. आचारसंहितेचा भंग केल्याच्या तक्रारीवर तात्काळ पुरावे आणा असं ओमराजे निंबाळकर यांना बजावलं आहे. आता याचप्रकरणावर राणा जगजितसिंह यांनी प्रतिक्रिया दिली. (Omraje Vs Archana Patil)

“…तर राजकारण सोडून देईल”

विरोधक खासदार हा बोलबच्चन आहे. अत्यंत चुकीचं वक्तव्य करत आहे. खासदाराने असे चुकीचे आरोप करू नयेत. त्यांच्यावर फौजीदारी कारवाई आहे. त्याने पुरावे द्यावेत. हे खरं असेल तर राजकारण सोडून देईल. आपण प्रामाणिकपणे रूग्णसेवा करतो. पैशात मोजण्याचा विषय नाही. मात्र विरोधक यामध्ये राजकारण करत आहेत. (Omraje Vs Archana Patil)

विरोधक राजकारण करत आहेत, अर्धवट माहिती देऊन दिशाभूल करण्याची वृत्ती विरोधकांची असल्याचं ते म्हणालेत. दरम्यान ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटील यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. काही दिवसांआधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी दर्ग्यात जात दर्शन घेतलं. तसेच शाल देखील चढवल्याचं पाहायला मिळालं.

News Title – Omraje Vs Archana Patil Both Are Election Commission Notice

महत्त्वाच्या बातम्या

‘पाच वर्षांपूर्वी मी मोठी चूक केली…’, शरद पवारांची जाहीर कबूली

बॉलीवूड कलाकार चक्क अंत्यदर्शनाला जाण्यासाठीही घेतात पैसे, अभिनेत्याचा मोठा खुलासा

मोठी बातमी! भाजपच्या नव्या प्रस्तावाने एकनाथ शिंदेंचं टेंशन वाढलं

माढ्यातील कापड व्यापाऱ्याचं भाकीत समोर, गेल्यावेळचा अंदाज ठरलेला खरा, आता म्हणतात…

‘त्यात एवढी मिरची लागायचं कारण नाही’, राऊतांचा नाना पटोलेंवर पलटवार