जय पवार यांची पहिल्यांदाच सुप्रिया सुळेंवर टीका, म्हणाले…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Baramati Lokabha | बारामती लोकसभा (Baramati Loksabha) निवडणुकीत दिवसेंदिवस अधिक रंगत निर्माण होताना दिसत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याआधी आपली बहिण सुप्रिया सुळे यांच्यावर प्रचारादरम्यान टीका केली. तर आता त्यांचेच पुत्र जय पवार यांनीही सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केलीये. जय पवार हे संसदरत्न फार मोठा पुरस्कार नसल्याचं म्हणालेत.(Baramati Loksabha)

“भोर तालुक्याला काय मिळालं?”

जय पवार यांनी सुप्रिया सुळेंविरोधात हल्लाबोल केलाय. सुप्रिया सुळे यांना संसदरत्न मिळाला भोर तालुक्याला काय मिळालं?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जय पवार यांनी रॅली काढत असताना हा सवाल उपस्थित केला होता. तेव्हा अनेक वर्षांपासून तुम्ही सुप्रिया ताईंना निवडून देत आहात. मात्र जशी कामं व्हायला हवी होती तशी कामं झाली नाहीत, असं जय पवार म्हणालेत. (Baramati Loksabha)

“संसद पुरस्कार हा फार मोठा पुरस्कार नाही”

आज त्या म्हणत आहेत की मला संसदरत्न मिळाला. पण भोर तालुक्याला काय मिळालं?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. संसद पुरस्कार हा फार मोठा पुरस्कार नाही. सरकारचा पुरस्कार नाही. एका एनजीओच्या माध्यमातून हा पुरस्कार दिला जातो, अशी टीका जय पवार यांनी केलीये.

बारामतीमध्ये जैन समाजाच्या कार्यक्रमासाठी सुप्रियाताई आणि मी एकत्र आलो आणि त्यांच्याशी मीच बोललो. आत्या तुम्ही पहिला नारळ ठेवा. तेव्हा सुप्रियाताई म्हणाल्या की जय तू नारळ ठेव. तेव्हा मी प्रार्थना करत असताना बारामती शहराचे अध्यक्ष जय पाटील होते. त्यावेळी प्रार्थना करत असताना सुप्रिया सुळे यांनी काय जय कसं काय? असा सवाल केला.

मी डोळे उघडताच पाहिलं म्हणालो बरं आहे. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की मी दुसऱ्या जयसोबत बोलत आहे. त्यानंतर त्यांनी सर्व व्हिडीओ पत्रकारांना दिले आणि वेगळी बातमी तयार करायला सांगितल्याचा दावा जय पवार यांनी केला.

News Title – Baramati Loksabha In Jay Pawar Target To Supriya Sule

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभा निवडणुकीचा पहिला निकाल बिनविरोध, भाजपचे दलाल विजयी!

‘पाच वर्षांपूर्वी मी मोठी चूक केली…’, शरद पवारांची जाहीर कबूली

बॉलीवूड कलाकार चक्क अंत्यदर्शनाला जाण्यासाठीही घेतात पैसे, अभिनेत्याचा मोठा खुलासा

मोठी बातमी! भाजपच्या नव्या प्रस्तावाने एकनाथ शिंदेंचं टेंशन वाढलं

माढ्यातील कापड व्यापाऱ्याचं भाकीत समोर, गेल्यावेळचा अंदाज ठरलेला खरा, आता म्हणतात…