हे बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान नष्ट करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल!, राहुल गांधींच्या आरोपांनी खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Lok Sabha Election 2024 | गुजरातमधील सुरत लोकसभा जागेसाठी 7 मे रोजी मतदान होणार होतं. मात्र निवडणुकीच्या अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी सुरतच्या जागेवरून भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आला.

भाजप उमेदवार बिनविरोध

गुजरातमधील सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल मतदानापूर्वीच बिनविरोध विजयी झाल्याचं घोषित करण्यात आलं आहे. याचं कारण म्हणजे आज आठही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे भाजपने पहिला विजय मिळवत विजयाचं खातं खोललं आहे.

काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांच्या फॉर्मवर भाजपकडून (BJP) आक्षेप नोंदवण्यात आला होता आणि त्यासंदर्भात काल म्हणजेच रविवारी सुनावणी होऊन काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज अवैध आणि रद्द ठरवण्यात आला.

दलाल यांच्या विजयाची सुरतच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घोषणा केली आहे. विशेष म्हणजे त्यांना खासदारकीचे पत्रही देण्यात आले आहे. अन्य सर्व उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता दलाल प्रत्यक्ष निवडणूक न लढवताच खासदार झाले आहेत.

राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप उमेदवाराच्या विजयावर प्रश्न उपस्थित करत या विजयाची तुलना हुकूमशाहीशी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवर लिहिले की, हुकूमशहाची खरी ‘सूरत’ पुन्हा एकदा देशासमोर आली आहे.

जनतेचा नेता निवडण्याचा अधिकार हिरावून घेणे हे बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान नष्ट करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की, ही केवळ सरकार स्थापन करण्याची निवडणूक नाही, ही निवडणूक देश वाचवण्याची, संविधानाच्या रक्षणाची निवडणूक आहे, असं राहुल गांधी म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

भर मैदानात रोहित शर्माला किस करण्याचा प्रयत्न, तुफान व्हायरल होतोय व्हिडीओ

जय पवार यांची पहिल्यांदाच सुप्रिया सुळेंवर टीका, म्हणाले…

अजित पवार यांची ही शेवटची निवडणूक, त्यांचा पक्ष सुद्धा अस्तित्वात राहणार नाही!

ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटील यांना निवडणूक आयोगाचा झटका!

चिन्मय मांडलेकरच्या निर्णयाने दिग्पाल लांजेकरांचं नुकसान?, नव्या चित्रपटाबद्दल थेट बोलले…