मालिकेतील सतत रडण्यामुळे अरुंधतीला झाला होता ‘हा’ आजार, पहिल्यांदाच केला खुलासा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Aai Kuthe Kay Karte | ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay karte) ही मालिका घरोघरी पोहोचली आहे. महाराष्ट्रात अगदी गावापासून ते शहरापर्यंत या मालिकेला मोठा प्रेक्षक वर्ग लाभला आहे. या मालिकेत सध्या असं काही घडलं आहे हे ऐकूण कदाचित तुम्हालाही धक्का बसेल. अरूंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभूलकरला मालिकेमध्ये अधिक रडण्याचा अभिनय केल्याने मधुराणी अजारी पडली असल्याची माहिती समोर आली आहे.

मालिका म्हटलं की सासू सून, नणंद भावजय, रडगाणं या सर्व गोष्टी पाहायला मिळतात. मात्र मालिकेत घडणाऱ्या गोष्टी कलाकाराच्या आयुष्यामध्ये घडताना दिसतात. मालिकेत अरूंधतीचा पती अशुतोषच्या निधनाने काही दिवस अरूंधती रडत होती. मानसिक धक्क्याने ती मालिकेमध्ये सतत रडताना दिसते. या भूमिकेमुळे ती आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये आजारी पडली आहे.

अरूंधतीने सतत रेग्युलर शुटींग करत असताना 10-12 दिवस रडण्याचे सीन केल्याने खऱ्या आयुष्यात काय त्रास झाला हे सांगितलं आहे. मधुराणीने नुकतीच ‘मिरची मराठी’ला मुलाखत देताना आपल्यावर बेतलेला प्रसंग सांगितला आहे.

अभिनेत्रीने बेतलेला प्रसंग सांगितला

“खूप तास काम करून तुमच्या मानसिकतेवर परिणाम होतो. मला हातचं काम राखून काम करता येत नाही. मी त्या भूमिकेत घुसते काम चांगलं आहे की वाईट हे मला माहिती नाही. पण आपल्याकडे ऑन-ऑफ करण्याची कला नाही का? पण तिच माझी खासियत आहे. मी अशीच आहे आणि असंच मला करता येतं”, असं मधुराणी म्हणाली. मालिकेत अशुतोषचे निधन झाल्यावर मी सलग तीन-चार दिवस बारा तास रडत होते”, असं मधुराणीने सांगितलं.


“मी सलग तीन-चार दिवस 12 तास रडण्याचे सीन्स करत  होते. त्यामुळे मला दडपण जाणवायला लागलं. सकाळी मी मोबाईलचा अलार्म बंद करायला उठले तेव्हा मला चक्कर येऊ लागली. दोन-तीन दिवस मी व्हर्टिगोच्या गोळ्या घेऊन काम करत होते. व्हर्टिगोच्या गोळ्या घेत मी आठवडाभर काम केलं.” असं मधुराणी म्हणाली.

“कलाराकाने छोटे ब्रेक घ्यावेत”

मधुराणीने सतत छोटे छोटे ब्रेक घ्यावेत असं सांगितलं. “मालिकेचं काम करत असताना तुमच्या भावनेच्या व्यवस्थापानेसाठी वेळ मिळत नाही. सतत तुम्ही त्या चक्रात असता. कलाकारांनी छोटे ब्रेक घ्यायला हवेत,” असं मला वाटतं असं मधुराणीने सांगितलं.

News Tiitle – Aai Kuthe Kaay karte Marathi Serail actress Madhurani Prabhulkar Face Health Issue

महत्त्वाच्या बातम्या

हे बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान नष्ट करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल!, राहुल गांधींच्या आरोपांनी खळबळ

भर मैदानात रोहित शर्माला किस करण्याचा प्रयत्न, तुफान व्हायरल होतोय व्हिडीओ

जय पवार यांची पहिल्यांदाच सुप्रिया सुळेंवर टीका, म्हणाले…

अजित पवार यांची ही शेवटची निवडणूक, त्यांचा पक्ष सुद्धा अस्तित्वात राहणार नाही!

ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटील यांना निवडणूक आयोगाचा झटका!