ट्रोलिंगमुळे हार्दिक पांड्याचे मानसिक संतुलन बिघडले!, नव्या गौप्यस्फोटाने खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Hardik Pandya | मुंबई इंडियन्सचा नवोदित कर्णधार हार्दिक पांड्या यंदाच्या हंगामात अधिक चर्चेत आहे. रोहित शर्मा याला कर्णधार पदावरून काढत पांड्याची वर्णी लावण्यात आली. यामुळे चाहते प्रचंड नाराज झाले. त्यामुळे प्रत्येक सामन्यात हार्दिकला चाहत्यांकडून ट्रोल केलं जातंय.

चाहत्यांचा रोष हार्दिकवर निघत आहे. मुंबईने हंगामात आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांना फक्त 3 सामने जिंकता आले आहेत. संघ पॉइंट टेबलमध्ये 6 गुणांसह 7 व्या स्थानी आहे. त्यामुळे यावर्षी मुंबईचा फॉर्म म्हणावा तेवढा चांगला नाहीये. त्यात सतत कर्णधार हार्दिकची होणारी ट्रोलिंग कुठेतरी संघाच्या फॉर्मवर परिणाम करणारी असल्याचं म्हटलं जातंय.

‘हार्दिकला ट्रोल करणं थांबवा’

हार्दिकची बाजू घेण्यासाठी अनेक दिग्गज मैदानात उतरले. पांड्यावर होणारी टीका चाहत्यांनी थांबवावी, असं आवाहन बऱ्याच दिग्गज क्रिकेटपटूंकडून करण्यात आलं.vआता यात माजी भारतीय क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाचं नावही जोडलं गेलं आहे. नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये रॉबिनने हार्दिकचं (Hardik Pandya) समर्थन करत त्याला होणाऱ्या मानसिक समस्यांचा उल्लेख केला आहे.

चाहत्यांकडून पांड्यावर जे काही ट्रोलिंग चालले आहे त्याचा त्याच्या मानसिकतेवर फरक पडत नसेल का, असा प्रश्न करत त्याने चाहत्यांना कळकळीची विनंती करत हे थांबवयला हवं, असं म्हटलं आहे. आपण संघासाठी भावूक आहात हे मला कळते, पण त्यामुळे आपण कोणाशीही असे वागू शकत नाही, असंही उथप्पाने यावेळी सांगितलं.

काय म्हणाला रॉबिन उथप्पा?

“जिंकणं  किंवा हरणं हा खेळाचा भाग आहे. आमच्या कामाचे प्रदर्शन होते त्यामुळे लोकांना टिका करण्यासाठी मैदान मोकळे मिळते. हेच तुम्ही सामन्य नोकरदारांसोबत नाही करू शकत. कोणावरही इतकी टीका करू नका ज्याने त्याच्या मानसिकतेवर परिणाम होईल.”, असं रॉबिन उथप्पा म्हणाला आहे.

तसंच पुढे तो म्हणाला की, हार्दिकला एवढं ट्रोल करण्यात आलंय की, त्याचं मानसीक संतुलन बिघडल्याचं दिसून येतंय.  त्याचबरोबर तो डिप्रेशनमध्ये जाईल की काय, अशी भितीही वाटत आहे. हार्दिक एक चांगला खेळाडू आहे. त्याच्यामध्ये चांगली गुणवत्ता आहे. रोहितला काढून हार्दिकला मुंबई इंडियन्सने कर्णधार केले. त्यानंतर हार्दिकला (Hardik Pandya) भयंकर पद्धतीने ट्रोल केलं जात आहे. हे ट्रोल करणे थांबवा, असं आवाहन रॉबिन उथप्पा याने केलं आहे.

News Title : Stop trolling Hardik Pandya Robin Uthappa requests fans

महत्त्वाच्या बातम्या-

सूरतमध्ये नवा ट्विस्ट, गुलाल उधळला, मात्र काँग्रेसच्या मागणीनं भाजपच्या आनंदावर पाणी?

धक्कादायक!!!, बारामतीत आणखी एका उमेदवाराला तुतारी चिन्ह, निवडणूक आयोग काय निर्णय घेणार?

अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीने पोलिसांवर केले मोठे आरोप; नेमकं प्रकरण काय?

सूर्यदेवाच्या कृपेने या दोन राशींना मिळणार चांगला पैसा

थंड घ्या… चिन्मय मांडलेकर ट्रेलिंग प्रकरणावर किरण मानेंचं बेधडक भाष्य