Post Office Scheme l आजकाल नागरिक सरकारच्या विविध योजनांसह पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये पैसे गुंतवणूक करण्यास जास्त भर देतात. कारण पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांमध्ये जबरदस्त परतावा मिळतो. पोस्ट ऑफिसची अल्पबचत योजना नागरिकांसाठी सर्वात्तम आहे. कारण अल्पबचत योजना ही दुप्पट परतावा देणारी योजना आहे.
अल्पबचत योजनेतून लाखो रुपयांची कमाई करण्याची संधी :
अल्पबचत योजना ही खास योजना गुंतवणूकदारांना व्याजाद्वारे लाखो रुपयांची कमाई करण्याची संधी देखील देत आहे. या योजनेत जास्तीत जास्त 5 वर्षांसाठी नागरिक पैसे गुंतवू शकतात. सध्या पोस्टाच्या अल्पबचत योजनेत 7.5 टक्के व्याज मिळत आहे. या योजनेत मागच्या वर्षी 1 एप्रिल 2023 रोजी पाच वर्षासाठी पोस्टाच्या टाइम डिपॉझिट योजनेचा व्याजदर हा 7 टक्क्यांवरून 7.5 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला होता.
जर गुंतवणूकदाराने पाच वर्षांसाठी पाच लाख रुपये गुंतवले आणि त्याला 7.5% दराने व्याज मिळाले तर या कालावधीत ठेवीवर त्याला 2,24,974 रुपये व्याज मिळते. तसेच गुंतवलेल्या पाच लाख रुपयांसह मॅच्युरिटीवर 7,24,974 रुपये मिळतात. म्हणजे पोस्टाच्या अल्पबचत योजनेत लाखो रुपयांच्या गुंतवणुकीवर लोकांना हमखास लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू शकते.
Post Office Scheme l पोस्टाच्या टाइम डिपॉझिट योजनेचा कालावधी किती? :
गुंतवणूकदार पोस्ट ऑफिसच्या या अल्पबचत योजनेत एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष आणि पाच वर्षांसाठी पैसे गुंतवणूक करू शकतात. तसेच या योजनेतील गुंतवणुकीच्या कालावधीनुसार व्याजदर निश्चित केला जातो.
जर गुंतवणूकदारांनी एका वर्षासाठी गुंतवणूक केली तर त्यावर 6.9% व्याज मिळते. तसेच जर दोन किंवा तीन वर्षासाठी पैसे गुंतवले तर गुंतवणूकदाराला 7% व्याज आणि पाच वर्षांसाठी गुंतवणूक केली तर 7.5% व्याज लाभ मिळते.
News Title : Small Saving Post Office Scheme
महत्त्वाच्या बातम्या-
ऐन उन्हाळ्यात नागरिकांना वीज दरवाढीचा शॉक, प्रति युनिट तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ
ट्रोलिंगमुळे हार्दिक पांड्याचे मानसिक संतुलन बिघडले!, नव्या गौप्यस्फोटाने खळबळ
मालिकेतील सतत रडण्यामुळे अरुंधतीला झाला होता ‘हा’ आजार, पहिल्यांदाच केला खुलासा
मराठमोळ्या ऋतुराजची पलटण केएल राहुलला धक्का देणार? CSK Vs LSG संघ आज भिडणार
सूरतमध्ये नवा ट्विस्ट, गुलाल उधळला, मात्र काँग्रेसच्या मागणीनं भाजपच्या आनंदावर पाणी?