‘शरद पवारांच्या मनात भाजप, त्यांचा आशीर्वाद घेऊनच नवनीत राणा..’, रवी राणांच्या दाव्याने खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ravi Rana | अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आलीये. तर, महाविकास आघाडीकडून इथे बळवंत वानखडे यांना तिकीट देण्यात आलंय. मविआच्या उमेदवारासाठी काल (21 एप्रिल) अमरावतीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. याच सभेत पवारांनी नवनीत राणा यांच्यावर टीका केली होती.

त्याला आता आमदार रवी राणा यांनी प्रत्युत्तर देत राजकारणात मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी शरद पवारांच्या आशीर्वादानेच नवनीत राणा भाजपत गेल्याचा दावा केला असून सुप्रिया सुळे यांच्या हट्टापायी ते भाजपला विरोध करत असल्याचं रवी राणा यांनी म्हटलं आहे.

इतकंच नाही तर, नवनीत राणांनी भाजपसोबत जावं ही शरद पवारांची इच्छा होती, त्यांनीच अजित पवारांना भाजपमध्ये पाठवलं असा दावाही रवी राणा यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या रवी राणा (Ravi Rana) यांच्या वक्तव्याचीच चर्चा रंगली आहे.

काय म्हणाले रवी राणा?

मागच्या निवडणुकीत शरद पवारांनी नवनीत राणांना पाठिंबा दिला होता, ते प्रचार करायला आले. पवारांच्या आशीर्वादामुळेच नवनीत राणा खासदार झाल्या. आता शरद पवारांचा आशीर्वाद घेऊनच नवनीत राणा या भाजपमध्ये गेल्या. शरद पवारांची इच्छा होती म्हणूनच अजित पवारांनाही त्यांनी भाजपमध्ये पाठवलं, असा दावा रवी राणा (Ravi Rana) यांनी केला आहे.

तसंच शरद पवार आतापर्यंत भाजपचा विरोध का करतात, यामागील कारणही यावेळी रवी राणा यांनी उघड केलं. काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या दबावामुळे आज पवार भाजपाच्या विरोधात बोलत आहेत. त्यांच्या मनात भाजपच आहे. पण, ओठावर ते विरोध दाखवतात. फक्त सुप्रिया सुळे यांच्या हट्टामुळे त्यांना भाजपसोबत जाता येत नाही, असा दावाच रवी राणा यांनी केलाय.

शरद पवार नेमकं काय म्हणाले होते?

‘मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे. माझ्याकडून एक चूक झाली. पाच वर्षापूर्वी जी निवडणूक झाली, तेव्हा त्या निवडणुकीतील उमेदवाराला मतदान करा म्हणून मी जाहीर सभा घेतल्या. लोकांनी माझा संदेश स्वीकारला आणि त्यांना पाठिंबा दिला, खासदार केलं. पण गेल्या पाच वर्षांतील त्यांचा अनुभव पाहिल्यावर माझ्या मनात अस्वस्थता होती. कधी तरी जावं आणि अमरावतीकरांना सांगावं आमच्याकडून चूक झाली. म्हणून मी इथे आलो आहे. मला माझी जुनी चूक सुधारायची आहे. मागच्या वेळी एक चूक माझ्याकडून झाली अन् नवनीत राणा यांना पाठिंबा दिला. आता ती चूक कधी होणार नाही. ती चूक दुरुस्त करणार आहे. आता बळवंत वानखडे यांना विजयी करा, हे सांगायला मी आलो आहे’, असं शरद पवार सभेत म्हणाले होते. त्यालाच रवी राणा (Ravi Rana) यांनी प्रत्युत्तर दिलं.

News Title : Ravi Rana Claim On Sharad Pawar Statement

महत्त्वाच्या बातम्या-

सूरतमध्ये नवा ट्विस्ट, गुलाल उधळला, मात्र काँग्रेसच्या मागणीनं भाजपच्या आनंदावर पाणी?

धक्कादायक!!!, बारामतीत आणखी एका उमेदवाराला तुतारी चिन्ह, निवडणूक आयोग काय निर्णय घेणार?

अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीने पोलिसांवर केले मोठे आरोप; नेमकं प्रकरण काय?

सूर्यदेवाच्या कृपेने या दोन राशींना मिळणार चांगला पैसा

थंड घ्या… चिन्मय मांडलेकर ट्रेलिंग प्रकरणावर किरण मानेंचं बेधडक भाष्य