“आम्ही बापाच्या 2 नंबरच्या पैशावर…”; भाजप महिला पदाधिकारी आणि शिंदे गटाच्या नेत्यामध्ये वादाचा भडका

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

BJP Vs Shivsena | लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. राज्यात मतदानाचा पहिला टप्पा पार पडला आहे. मात्र अजूनही महायुतीच्या गोट्यात वाद-विवाद सुरूच असल्याचं चित्र दिसून येत आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचं असून त्यासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष सध्या एकदिलाने वाटचाल करत असल्याचं या तीन पक्षातील नेते म्हणत आहेत.

मात्र, प्रत्यक्षात स्थिती काहीतरी वेगळीच दिसून येत आहे. कुठे उमेदवारीवरून नाराजी तर कुठे नेत्यांच्या आप-आपसातील वाद चव्हाट्यावर येत आहेत. याचा प्रत्यय मुंबईत दिसून आला. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या माहीम विधानसभा मतदरासंघात शिंदे गट आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांमधील वाद उफाळून आला आहे.

भाजप-शिंदे गटातील वाद उफाळला

भाजपच्या माहीम विधानसभा क्षेत्राच्या अध्यक्ष अक्षता तेंडुलकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर (Sada Sarvankar) आणि त्यांचे सुपुत्र तथा माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्यातील जुने वाद आता अजूनच चिघळत असल्याचं येथे दिसून येतंय.

समाधान सरवणकर हे मुंबई महानगरपालिकेतील शिंदे गटाचे माजी नगरसेवक आहेत. त्यांची बहीण प्रिया सरवणकर यांचे अक्षता तेंडुलकर यांच्याशी वाद आहेत. राज्यात शिंदे गट आणि भाजपा यांची युती असली (BJP Vs Shivsena ) तरी या स्थानिक नेत्यांना आपली जुनी वितुष्ट मिटवण्यात अजूनही अडचणी येत आहेत. आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्षता तेंडुलकर यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत प्रिया सरवणकर आणि समाधान सरवणकर यांच्यावर जळजळीत भाषेत टीका केली.

भाजप महिला पदाधिकाऱ्याची पोस्ट

‘हिंदुत्व आणि मोदींजींसाठी आम्ही काम करतो. बापाच्या दोन नंबरच्या पैश्यावर आणि पदावर आम्ही नाही उडत, आणि युतीधर्म फक्त भाजप पाळणार, अशा गैरसमजात अजिबात राहू नका.आमच्या नादी लागलात तर आरे ला कारे करायला आम्हाला चांगलंच जमतं.’,अशी पोस्ट अक्षता तेंडुलकर यांनी फेसबुकवर केली आहे.

दरम्यान, भाजप आणि शिंदे गटातील या वादाचा (BJP Vs Shivsena )फटका आता दक्षिण मध्य मुंबईतील शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे यांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडून हा वाद लवकरात लवकर मिटवण्याचे प्रयत्न केले  जातील.

News Title : BJP Vs Shivsena Akshata Tendulkar criticism of Samadhan Saravankar

महत्त्वाच्या बातम्या-

सूरतमध्ये नवा ट्विस्ट, गुलाल उधळला, मात्र काँग्रेसच्या मागणीनं भाजपच्या आनंदावर पाणी?

धक्कादायक!!!, बारामतीत आणखी एका उमेदवाराला तुतारी चिन्ह, निवडणूक आयोग काय निर्णय घेणार?

अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीने पोलिसांवर केले मोठे आरोप; नेमकं प्रकरण काय?

सूर्यदेवाच्या कृपेने या दोन राशींना मिळणार चांगला पैसा

थंड घ्या… चिन्मय मांडलेकर ट्रेलिंग प्रकरणावर किरण मानेंचं बेधडक भाष्य