राजस्थानकडून पराभव झाल्यावर हार्दिकनं सांगितली ‘ही’ कारणं, चेहऱ्यावर हसू मात्र कायम!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Hardik Pandya | राजस्थान रॉयल्स विरूद्ध मुंबई इंडियन्स संघात काल वानखेडे मैदानावर सामना पार पडला. पुन्हा मुंबई इंडियन्स संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं. मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलमधील लज्जास्पद पराभव होता असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. कारण म्हणावी अशी गोलंदाजी आणि म्हणावं असं क्षेत्ररक्षण झालं नाही. गचाळ क्षेत्ररक्षण झाल्यानं मुंबई इंडियन्स पराभूत झाल्याचं कारण मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व करणारा हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) सांगितलं. सामना संपल्यानंतर आपल्या संघाच्या त्रुटी सांगत असताना त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं.

गेल्या काही दिवसांआधी एका माजी क्रिकेटपटूनं पांड्याच्या (Hardik Pandya) चेहऱ्यावरील हसू हे खोटं असल्याचा दावा केला होता. त्यावेळी माजी क्रिकेटपटूनं झाप झाप झापलं होतं. अनेक चाहते पांड्यावर नाराज आहेत. अनेकजण पांड्याला ट्रोलिंग करत असल्याने त्याचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचं देखील म्हणत आहेत. राजस्थानच्या पराभवाने राजस्थानला प्लेऑफचं दार उघडं झालंय. तर मुंबई इंडियन्सच्या पराभवाने त्यांच्यावर टांगती तलवार आहे. (Hardik Pandya)

राजस्थान रॉयल्स विरूद्ध मुंबई इंडियन्स खेळी

राजस्थान रॉयल्स विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने 9 गड्यांनी विजय मिळवला. संदीप शर्माचे 5 बळी आणि यशस्वी जयस्वालची शतकी खेळी मुंबई इंडियन्स संघासाठी घातक ठरली होती. मुंबई इंडियन्स संघाने सुरूवातीला 20 षटकांत 9 बाद 179 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सला 180 धावांचं लक्ष देण्यात आलं. राजस्थानने हे लक्ष 18.4 षटकांत 1 बाद 183 धावा करत पार केले. (Hardik Pandya)

यशस्वी-जॉस बटलरने 74 धावांची खेळी केली. तर संजू सॅमसन आणि यशस्वीने 65 चेंडूंत नाबाद 109 धावांची भागीदारी केली. ऐनवेळेवर मुंबई इंडियन्सने दोन झेल सोडले. यामुळे गचाळ क्षेत्ररक्षणाने फटका बसला.

पांड्याच्या चेहऱ्यावर हसू

संघ पराभव झाल्यानंतर पांड्याने पराभवाचं कारण सांगितलं आहे. सामन्यात झालेल्या त्रुटीवर बोलत होता. त्यावेळी तो हसत सर्व काही सांगत होता. शेवटच्या षटकात फलंदाजी करत असताना आम्हाला आणखी 10-15 धावांची गरज होती. त्याच धावा कमी पडल्याने परभवाला सामोरं जावं लागलं. क्षेत्ररक्षणही योग्य झालं नाही. गचाळ क्षेत्ररक्षण झालं. असं सांगित असताना त्याच्या चेहऱ्यावरील हस्य जरासा देखील कमी झालं नाही.

दरम्यान याआधी देखील पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सचा पराभव झाला. मात्र असं असलं तरीही पांड्या हसत आपल्या प्रतिक्रिया देतो. मात्र हेच हसू खोटं असल्याचा दावा माजी क्रिकेटपटू पीटरसनने याआधी केला होता.

News Title – Hardik Pandya Smile After Finish Match

महत्त्वाच्या बातम्या

सूरतमध्ये नवा ट्विस्ट, गुलाल उधळला, मात्र काँग्रेसच्या मागणीनं भाजपच्या आनंदावर पाणी?

धक्कादायक!!!, बारामतीत आणखी एका उमेदवाराला तुतारी चिन्ह, निवडणूक आयोग काय निर्णय घेणार?

अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीने पोलिसांवर केले मोठे आरोप; नेमकं प्रकरण काय?

सूर्यदेवाच्या कृपेने या दोन राशींना मिळणार चांगला पैसा

थंड घ्या… चिन्मय मांडलेकर ट्रेलिंग प्रकरणावर किरण मानेंचं बेधडक भाष्य