“पार्थला भाऊ म्हणून सांगतो…”, रोहित पवारांचा उपरोधिक टोला

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rohit Pawar | लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला आहे. यापार्श्वभूमीवर विरोधक आणि सत्ताधारी प्रचारासाठी आपापल्या मतदारसंघात प्रचार करत आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांचा प्रचार करताना दिसत आहेत. यापार्श्वभूमीवर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पार्थ पवार आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीला मावळ लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना लोकसभेचं तिकिट देण्यात आलं होतं. मात्र श्रीरंग बारणे यांनी मताधिक्याने पार्थ पवार यांचा पराभव केला. मात्र आता ज्याने आपल्या मुलाचा पराभव केला, त्याच्या विजयासाठी प्रचार करताना दिसत असल्याचं रोहित पवार (Rohit Pawar) म्हणालेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पार्थ तुझा पराभव विसरलो नसल्याचं रोहित पवार (Rohit Pawar) म्हणालेत.

“पार्थला भाऊ म्हणून सांगतो…”

“पार्थला भाऊ म्हणून सांगतो, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघात उभा होता. यावेळी महायुतीच्या विरोधात प्रचार केला होता. पार्थ मोठ्या मताधिक्याने पराभव झाला. तो पराभव पार्थ विसरला नसेल. त्याचा भाऊ म्हणून मी आज येथे आलोय. परंतु मुलाचा पराभव करणाऱ्यांच्या विजयासाठी अजित पवार (Rohit Pawar) आले. ते कोणत्या पातळीवर गेलेत,” असं म्हणत रोहित पवार यांनी टीका केली.

नुकतीच अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. त्यावर देखील रोहित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. “जयला विनंती आहे की भाजपसारखी सवय लावू नये. भाजपसारखे खोटं बोलणारी तुझी प्रतिमा करू नको.” तसेच पार्थ पवार यांना सुरक्षा दिली होती त्यावर देखील रोहित पवार यांनी पार्थ पवार यांच्यावर मिश्किल टीका केलीय.

“पार्थला वाय कशाला झेड सुरक्षा द्या”

“इकडे कोयता गँगने धुमाकूळ घातलाय. तिकडे त्यांचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही देणघेणं नाही. पार्थ पवार यांना सुरक्षा देण्यात आली होती. त्यावर देखील रोहित पवार यांनी वक्तव्य केलं. पार्थला वाय कशाला झेड सुरक्षा द्या”, असा मिश्लिक टोला लगावला आहे.

News Title – Rohit Pawar About Parth Pawar Y Security

महत्त्वाच्या बातम्या

“आम्ही बापाच्या 2 नंबरच्या पैशावर…”; भाजप महिला पदाधिकारी आणि शिंदे गटाच्या नेत्यामध्ये वादाचा भडका

‘शरद पवारांच्या मनात भाजप, त्यांचा आशीर्वाद घेऊनच नवनीत राणा..’, रवी राणांच्या दाव्याने खळबळ

फडणवीस-सामंत यांच्या भेटीनंतरही विनोद पाटील ठाम, मुख्यमंत्री उचलणार मोठं पाऊल!

पोस्टाची अल्पबचत योजना तुफान लोकप्रिय, फक्त व्याजातूनच व्हाल मालामाल!

ऐन उन्हाळ्यात नागरिकांना वीज दरवाढीचा शॉक, प्रति युनिट तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ