हार्दिक पांड्या T20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाच्या अडचणी वाढवू शकतो!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Hardik Pandya | देशात सध्या आयपीएलचा हंगाम सुरू आहे. आयपीएल संपल्यानंतर लगेच जून महिन्यात T20 वर्ल्ड कप होणार आहे. यासाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा होणार आहे. टीम सिलेक्शन दिल्लीमध्ये होणार आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा सुद्धा या बैठकीला उपस्थित असणार आहे.

मात्र, या बैठकीपूर्वीच माजी भारतीय क्रिकेटपटूने एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. त्याने आयपीएल स्पर्धेतील मुंबई इंडियन्सचा कर्णधार तथा टीम इंडियाचा स्टार ऑल राऊंडर हार्दिक पांड्यावर निशाणा साधला आहे. त्याने हार्दिक पांड्यालाच पिंजऱ्यात उभ केलंय.

इरफान पठाण याने हार्दिकबद्दल मोठं वक्तव्य केलंय. इरफानने पांड्याबद्दल थेट काही प्रश्न निर्माण केलेत. T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये तो  भारतीय संघाच्या अडचणी वाढवू शकतो, असं इरफानने म्हटलं आहे. त्याचं हे विधान आता चर्चेत आलं आहे.

पांड्याच्या सध्याच्या फॉर्मबद्दल, त्याच्या चेंडू हिट करण्याच्या क्षमतेबद्दल ही चिंता आहे. तसंच हार्दिकच्या फिटनेस आणि गोलंदाजीवरही इरफानने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. सध्या पांड्या टीम इंडियाची ताकद नाही, तर सर्वात मोठी कमजोरी ठरतोय, असं इरफान पठाणच्या बोलण्यावरून दिसत असल्याची चर्चा क्रिकेटविश्वात आहे.

नेमकं काय म्हणाला इरफान पठाण?

“हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya ) बॅटिंग करण्याच्या क्षमतेमध्ये घसरण होतेय. चेंडू सीमारेषेपार पोहोचवण्याची क्षमता पहिल्यासारखी दिसत नाही. टीम इंडियाच्या दृष्टीकोनातून हे चांगले संकेत नाहीत. ही चिंता वाढवणारी बाब आहे. हार्दिक वानखेडेवर खेळताना वेगळा दिसतो. तेच गोलंदाजांना मदत मिळणाऱ्या पीचेसवर हार्दिकचा संघर्ष सुरु असतो, ही चिंतेची बाब आहे” असं इरफान पठाणने म्हटलं आहे. त्याने एक्सवर (पूर्वीचे ट्वीट) ही पोस्ट केली आहे. त्यामुळे सध्या इरफान पठाणची ही पोस्ट चर्चेत आली आहे.

हार्दिकची यंदाच्या आयपीएलमधील कामगिरी

हार्दिक पांड्या सध्या त्याच्या खेळीमुळे नाही तर कर्णधार पदावरून ट्रोल होत आहे. मुंबईच्या कर्णधार पदावरून रोहित शर्माला काढत हार्दिककडे संघांचं नेतृत्व देण्यात आलं. या निर्णयामुळे चाहत्यांची फार निराशा झाली. मुंबईचे चाहते प्रत्येक सामन्यात हार्दिकला ट्रोल करताना दिसून येतात. त्यात त्याची म्हणावी तशी कामगिरी दिसून येत नाहीये.

हार्दिक पंड्याने (Hardik Pandya ) IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना आतापर्यंत झालेल्या 8 सामन्यात फक्त 151 धावा केल्या आहेत. त्यात 39 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. 8 सामन्यात हार्दिकने फक्त 7 सिक्स लगावलेत. पांड्याचा या सीजनमधील बॅटिंग स्ट्राइक रेट आतापर्यंत 142.45 चा आहे. त्याने यंदाच्या सीजनमध्ये 8 सामन्यात केवळ 4 विकेट काढल्या आहेत.

News Title : Hardik Pandya Targeted By Irfan Pathan Ahead Of Team India Selection For T20 World Cup

महत्त्वाच्या बातम्या-

आम्ही स्वतःला सुरुवातीलाच अडचणीत आणलं!, हार्दिकनं पराभवाचं खापर फोडलं रोहित शर्मावर!

‘या’ वाईट सवयींमुळे माणूस होतो अधिक गरीब

मोठी गुड न्यूज! उच्चांकी दरवाढीनंतर सोन्याचे भाव उतरले, आता ‘असे’ आहेत दर

सोलापुरात भाजपला आणखी एक धक्का, फडणवीसांच्या विश्वासू सहकाऱ्याने साथ सोडली!

वंचित बहुजन आघाडीने वाढवलं भाजपचं टेन्शन, ‘या’ मतदारसंघात पराभव होणार?