सोलापुरात भाजपला आणखी एक धक्का, फडणवीसांच्या विश्वासू सहकाऱ्याने साथ सोडली!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sanjay Kshirsagar | उमेदवारी न मिळाल्याने नाराज नेते थेट पक्ष सोडण्याच्या तयारीत दिसून येत आहेत. ही स्थिती महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही घटक पक्षांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे प्रचारसभांऐवजी पक्षश्रेष्ठींना या नाराज नेत्यांची मनधरणी करण्यावरच अधिक भर द्यावा लागत आहे. नाराजीमुळे बऱ्याच मतदारसंघात भाजप तसंच महाविकास आघाडीला धक्के बसले आहेत.

अशात सोलापूर मतदारसंघ चर्चेत आला आहे. इथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने भाजपला धक्का दिला आहे. सोलापूरमधील भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जाणारे मोहोळचे भाजप नेते संजय क्षीरसागर पक्षाला रामराम ठोकणार आहेत. भाजपमध्ये आपला अपमान होत असल्याचे सांगत त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर केलाय.

संजय क्षीरसागर भाजपा सोडणार

देवेंद्र फडणवीस यांना मोठा धक्का देत आता संजय क्षीरसागर शरद पवारांचा हात धरणार आहेत. उद्या 24 एप्रिलरोजी आपण शरद पवार गटात जाणार असल्याची माहिती स्वतः क्षीरसागर यांनी दिली आहे. त्यामुळे फडणवीस यांना हा सर्वांत मोठा धक्का मानला जात आहे.ते फडणविसांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.

संजय क्षीरसागर (Sanjay Kshirsagar) यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सर्व हकीकत सांगितली आहे. भाजपात गेल्या दहा वर्षांत मला कायम अपमानास्पद वागणूक दिली गेली. त्यामुळे मी पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. वरिष्ठ नेत्यांना पक्षात आपणास कसा त्रास दिला गेला, त्याचे पुरावे दिले, असं संजय क्षीरसागर यांनी सांगितलं आहे.ऐन निवडणूकीच्या रणधुमाळीत त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याने भाजपला याचा फटका बसू शकतो.

फडणवीसांचा विश्वासू शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार

यावेळी त्यांनी पक्षात कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला, याचाही खुलासा केला. मी गेल्या 5 वर्षांपासून राजकारणात आहे. राजकारणात असताना जनतेने माझ्यावर भरभरुन प्रेम केलं. पण, त्या बदल्यात मला त्यांना काहीच देता आलं नाही. भाजपाकडून मला आजपर्यंत जनतेसाठी कुठलाच निधी मिळाला नाही. मग त्याची परतफेड कशी होईल?, असा सवाल करत संजय क्षीरसागर (Sanjay Kshirsagar) यांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, जिल्ह्यातील राजकारणास कंटाळून क्षीरसागर पक्षातून बाहेर पडत असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.याबाबत स्वतः क्षीरसागर यांनीही बोलून दाखवलं आहे. फडणवीस यांना हा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का मानला जात आहे. याचा परिणाम भाजपच्या उमेदवारावर होण्याचीही शक्यता आता वर्तवली जात आहे.

News Title : Sanjay Kshirsagar will join Sharad Pawar NCP

महत्त्वाच्या बातम्या-

सूरतमध्ये नवा ट्विस्ट, गुलाल उधळला, मात्र काँग्रेसच्या मागणीनं भाजपच्या आनंदावर पाणी?

धक्कादायक!!!, बारामतीत आणखी एका उमेदवाराला तुतारी चिन्ह, निवडणूक आयोग काय निर्णय घेणार?

अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीने पोलिसांवर केले मोठे आरोप; नेमकं प्रकरण काय?

सूर्यदेवाच्या कृपेने या दोन राशींना मिळणार चांगला पैसा

थंड घ्या… चिन्मय मांडलेकर ट्रेलिंग प्रकरणावर किरण मानेंचं बेधडक भाष्य