शाळा 9 वाजल्यानंतर भरणार का?, शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Deepak Kesarkar | राज्यातील शाळांच्या वेळा बदलण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी घेतला होता. शाळांच्या वेळा बदलून 9 नंतर विद्यार्थ्यांना शाळेत पाठण्याचा निर्णय घेण्यात आला होता. लहान मुलांच्या झोपेचं कारण देत राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयावर आता पालक तसेच बसचालकांनी काही प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हटलं आहे?

लहान मुलांच्या झोपेचा प्रश्न उपस्थित करत शाळेच्या वेळेत बदल करण्यात येणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, या निर्णयावर शाळेचे बसचालक आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांची भूमिका जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी ‘नव्या वेळापत्रकामुळे कोणकोणत्या घटकांच्या समस्या आहेत त्यांनी त्या मांडाव्यात. त्यावर निश्चितपणे तोडगा काढला जाईल’ असं म्हटलंय.

मोठ्या मुलांच्या शाळा सत्रात भरणार?

दरम्यान, वर्गात जर विद्यार्थ्यांना जागा बसण्यासाठी जागा पुुरत नसेल किंवा वर्गखोल्यांचे प्रश्न उपस्थित होत असेल तर मोठ्या मुलांच्या शाळा सकाळच्या सत्रात भरवू असं म्हटलं आहे.

पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेत बदल केल्याने पालकांसह बसचालकांचाही त्याला विरोध सुरू आहे. शिवाय वर्गखोल्यांची संख्या, सकाळच्या वेळेतील वाहतूक कोंडी, प्रदूषण या समस्याही उद्भवणार असल्याचं मंत्री केसरकर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी प्रत्येकाने त्यांना भेडसावणारे प्रश्न मांडावेत, असं त्यांनी म्हटलंय. (Deepak Kesarkar).

पूर्व प्राथमिक शाळेंच्या वेळेत बदल-

सकाळच्या शाळेमुळे सध्या लहान मुलांची पुरेशी झोप होत नसल्याचं शास्त्रज्ञांनीच सांगितलं आहे. त्यामुळे पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या मुलांच्या शाळांच्या वेळेत बदल केला आहे. या बदलामुळे पालक, बसचालक यांच्यावर काही परिणाम होत असेल तर त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या जातील. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने मला यावर बोलता येणार नाही. पण, ती संपल्यानंतर त्यांच्या समस्या ऐकून निश्चितपणे यावर तोडगा काढला जाईल, असंही त्यांनी म्हटलंय.

News Title : deepak kesarkar talks about school schedule

महत्त्वाच्या बातम्या-

“रोहित शर्मा तरी कुठे…”, ‘या’ माजी खेळाडूकडून पांड्याची पाठराखण

आधी बिनशर्त पाठिंबा, आता मनसेनं वाढवल्या एकनाथ शिंदेंच्या अडचणी!

“चहलने माझा नवरा चोरला”, रोहित शर्माच्या पत्नीच्या आरोपांची एकच चर्चा

“देवेंद्र फडणवीसांना अटक होण्याची भीती म्हणून…”, संजय राऊतांचा धक्कादायक दावा

‘ते माझ्या बॅाडी पार्ट्सवर…’; अभिनेत्री नोरा फतेहीच्या वक्तव्याने बॅालिवूडमध्ये खळबळ