‘संघर्षयोद्धा’ चित्रपट अडचणीत?; मनोज जरांगे पाटलांचा इशारा, म्हणाले…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange | मराठा आरक्षणाचे योद्धा मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांचा “संघर्षयोद्धा” या चित्रपटाची गेली अनेक दिवसांपासून चर्चा आहे. गेल्या काही महिन्यांपासून चित्रपटाची निर्मिती प्रक्रिया सुरू होती.

येत्या 26 एप्रिलला चित्रपटाची रिलीज डेट ठरली होती. मात्र सेन्सॉरने या चित्रपटाला अडकवून ठेवलंय. आता ही रिलीज डेट आणखी पुढे गेली असल्याची माहिती समोर आलीये. यावर आता मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी प्रतिक्रिया दिलीये. (Manoj Jarange)

काय म्हणालं सेन्सॉर बोर्ड?

सेन्सॉर बोर्डने संघर्षयोद्धा या चित्रपटाबद्दल मोठी अपडेट दिली आहे. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने चित्रपट प्रदर्शित करता येणार नसल्याचं बजावलं आहे. सध्या लोकसभा निवडणूक आहे. यापार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे सध्या चित्रपट प्रदर्शित करता येणार नसल्याचं सेन्सॉर बोर्ड म्हणत आहे. (Manoj Jarange)

मनोज जरांगेच्या संघर्षयोद्धा चित्रपटाचे निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी या चित्रपटाच्या निर्मितीबाबत सांगितलं आहे. गेली चार ते पाच महिने सर्व टीमने या चित्रपटाच्या निर्मितीच्या काळामध्ये मेहनत घेतली आहे. ऐनप्रदर्शनाच्या तोंडावर आमचा चित्रपट प्रदर्शनापासून थांबवल्याचं मला दु:ख होत असल्याचं दोलताडे म्हणालेत. तर हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित होईल तेव्हा सुपरहीट असल्याचं मनोज जरांगे यांची भूमिका करणारे अभिनेते रोहित पाटीलने प्रतिक्रिया दिलीये.

रिलीज डेट आली समोर

संघर्षयोद्धा हा चित्रपट 26 एप्रिलला रिलीज होणार होता. मात्र सेन्सॉर बोर्डामुळे रिलीज करता आला नाही. चित्रपटासाठी उत्सुक असलेली जनता नाराज असल्याचा दावा चित्रपटाचे दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी केलाय. सेन्सॉर बोर्डाने दिलेली सूचना मनोज जरांगे यांना सांगितली. मात्र हा चित्रपट 21 जून 2024 रोजी रिलीज होणार असल्याची माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक शिवाजी दोलतोडे यांनी सांगितली.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी सेन्सॉर बोर्डाच्या सूचनेवर भाष्य केलंय. संघर्षयोद्धा हा चित्रपट जरी थांबवला असला तरीही 21 जून 2024 रोजी सर्वत्र चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सर्व मराठा समाज, महाराष्ट्र हा चित्रपट पाहिल. जर जाणूनबुजून चित्रपट आडवण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे, असं मनोज जरांगे म्हणालेत.

News Title – Manoj Jarange Patil Biography Film Censor board Did Not Give Certificate Sangharsha Yoddha

महत्त्वाच्या बातम्या

‘पूर्ण बरे होऊनच परत या…’; ‘या’ नेत्याने भरला संजय राऊतांचा मनोरूग्णालयाचा फॉर्म

‘देशात मोदींच्या रुपाने नवीन पुतीन तयार होतोय…’; शरद पवारांची मोदींवर टीका

लोकसभा निवडणुकीचा पहिला निकाल बिनविरोध, भाजपचे दलाल विजयी!

‘पाच वर्षांपूर्वी मी मोठी चूक केली…’, शरद पवारांची जाहीर कबूली

बॉलीवूड कलाकार चक्क अंत्यदर्शनाला जाण्यासाठीही घेतात पैसे, अभिनेत्याचा मोठा खुलासा