Mahua Moitra | महुआ मोईत्रांची खासदारकी रद्द; वाचा काय घडलं संसदेत?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | TMC खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. नैतिक समितीने गुरुवारी लोकसभेत याप्रकरणी अहवाल सादर केला. यावर चर्चा देखील झाली. यानंतर लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याबाबतचा नैतिक समितीचा अहवाल लोकसभेत स्वीकारण्यात आला आहे. समितीने आपल्या अहवालात महुआवरील (Mahua Moitra) आरोप गंभीर असल्याचं सांगत कारवाईची मागणी केली होती. तसेच संसद सदस्यत्व रद्द करण्याची मागणी देखील केली होती.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले की, 15 ऑक्टोबर 2023 रोजी खासदार निशिकांत दुबे यांच्या तक्रारीवरून आचार समितीला महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांच्यावरील आरोप खरे ठरले. या कारणास्तव त्यांना लोकसभेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही. लोकसभेने हा प्रस्ताव मंजूर केला आहे.

(Mahua Moitra) महुआ मोईत्रा भडकल्या

मी अदानी समूहाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळे मुद्द्यांवरून लक्ष वळवण्यासाठी हा सगळा प्रकार करण्यात आला आहे. भेटवस्तू आणि रोख रकमेचा कोणताही पुरावा नाही. समितीला सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार नाही, असं त्या म्हणाल्यात.

सदस्यत्व रद्द केल्याने TMC खासदार रद्द

खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांची खासदारकी रद्द केल्याने तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी लोकसभेच्या अधिकारावरच प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, “लोकसभेला आपल्या कोणत्याही सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार नाही.

संविधानाच्या कलम 102 आणि घटनेच्या 10 व्या अनुसूचीमध्ये संसदेचे सदस्यत्व रद्द करण्याची संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की संसदीय कायद्याच्या नियम 374 नुसार सभागृह आपल्या सदस्याला निलंबित करू शकते, परंतु त्याला बडतर्फ करू शकत नाही”

महत्त्वाच्या बातम्या- 

Skin Care | ग्लोईंग स्कीनसाठी रोज ‘या’ गोष्टी न चुकता करा 

Gold-Silver Price Today | ऐन लग्नसराईत सोनं महागलं; जाणून घ्या आजचे दर 

Devendra Fadnavis | महायुतीत वादाची ठिणगी?; फडणवीसांचा थेट अजित पवारांना इशारा 

Rohit Sharma | गौतम गंभीरनं उडवली रोहित शर्माची खिल्ली 

Karan-Tejasswi | करण कुंद्रा-तेजस्वी प्रकाशच्या चाहत्यांसाठी मोठी गुड न्यूज!