मुंबई | 3 पक्ष मिळून सत्तेत असलेल्या महायुती सरकारमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडल्याचं दिसत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) पत्रामुळे महायुतीमधील मतभेद चव्हाट्यावर आलेत. या मतभेदाचं कारण ठरलेत राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार नवाब मलिक. नवाब मलिक आज हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपुरात आले. ते आज सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या आमदारांच्या जवळ बसले. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं.
Devendra Fadnavis | फडणवीसांचा थेट अजित पवारांना इशारा
नवाब मलिक यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं दिसतंय. मात्र असं असलं तरी भाजपने मात्र नवाब मलिक यांना महायुतीत सहभागी करुन घेण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित पवारांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात फडणवीसांनी (Devendra Fadnavis) थेट अजित पवारांना इशाराच दिला आहे.
नवाब मलिक सत्ताधारी आमदारांच्या बाकावर बसले. त्यामुळे ते अजित पवार गटात सहभागी झाले. पण नवाब मलिकांना सत्तेत सहभागी करुन घेऊ नका. त्यांच्या देशद्रोहासारखे आरोप आहेत. सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. आपल्या पक्षात कुणाला घ्यावं हा तुमचा प्रश्न आहे.पण त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो, असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) दिलाय.
सत्ता येते आणि जाते.
पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा… pic.twitter.com/WDzm3Pjo3f— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 7, 2023
माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रुता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो. पण ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही असं आमचं मत आहे, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पत्रात म्हणाले.
नवाब मलिकांमुळे Devendra Fadnavis यांची कोंडी
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना भाजपने नवाब मलिकांवर गंभीर आरोप केले होते. यानंतर नवाब मलिकांना जेलमध्येही जावं लागलं. आता बाहेर आल्यानंतर राज्यातील समिकरणं बदलली आहेत. अजित पवार हे भाजपसोबत गेल्याने नवाब मलिक काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मलिक सत्ताधारी बाकावर बसल्याने फडणवीस (Devendra Fadnavis) यांची चांगलीच कोंडी झाली. कारण आघाडी सरकार असताना फडणवीसांनीच नवाब मलिकांना सळो की पळो करून सोडलं होतं. आता मात्र नवाब मलिकांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला तरी मलिकांना भाजप सत्तेत सहभागी करून घेईल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणारे.
महत्त्वाच्या बातम्या-
Rohit Sharma | गौतम गंभीरनं उडवली रोहित शर्माची खिल्ली
Karan-Tejasswi | करण कुंद्रा-तेजस्वी प्रकाशच्या चाहत्यांसाठी मोठी गुड न्यूज!
IPL | न्यूझीलंडचा ‘हा’ खेळाडू तुमच्या संघात हवाच!, इरफान पठाणने कुणाला दिला मोलाचा सल्ला
Manoj Jarange | “मराठ्यांना आरक्षण मिळू द्या, छगन भुजबळांचा कार्यक्रमच करतो”
Chhagan Bhujbal | ‘आता मराठा शिल्लक राहणार नाही’; भुजबळांचं मोठं वक्तव्य