Manoj Jarange | “मराठ्यांना आरक्षण मिळू द्या, छगन भुजबळांचा कार्यक्रमच करतो”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

यवतमाळ | मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जालना जिल्ह्यामध्ये उपोषणाला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांचं हे आंदोलन संपूर्ण राज्यात पसरलंय. तर दुसरीकडे मराठा विरूद्ध ओबीसी समाज असं चित्र राज्यात निर्माण झालंय. दोन्ही समाजाचे नेते आक्रमक झालेत. दोन्ही समाज एकमेकांच्या विरुद्ध आंदोलन करत आहे.

या मुद्द्यावर ठोस तोडगा काढण्यासाठी जरांगे यांनी राज्य शासनाला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे. मात्र, त्याआधी ओबीसी आणि मराठा समाजामध्ये तेढ निर्माण होताना दिसत आहे. अशात पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी (Manoj Jarange) छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे.

“छगन भुजबळांचा कार्यक्रमच करतो”

मराठ्यांना आरक्षण मिळू द्या, छगन भुजबळांचा कार्यक्रमच करतो, असं मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी म्हटलं आहे.

मराठा समाजाला एकदा आरक्षण मिळू द्या, मग मी त्याचा कार्यक्रम वाजवतो. इतक्या उच्च दर्जाचा एक पुढारी गोरगरीब मराठ्यांच्या मुलांना आरक्षण मिळू देत नाहीये, असं जरांगे म्हणालेत.

भुजबळांच मोठं वक्तव्य

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षणावर मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रात आता मराठा शिल्लक राहणार नाही, असं छगन भुजबळांनी म्हटलंय.

हरिभाऊ राठोड ओबीसीमध्ये फूट पाडण्यासाठी कित्येक वर्ष प्रयत्न करत आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाचे सर्व लोक राजीनामा देत आहेत, तो आयोग आता ओबीसीचा राहिलेला नाही. तो मराठा आयोग झालेला आहे. जरांगेचा रोजचं काम आहे बोलणं, त्याच्याशिवाय त्याचं भाषण कोणी ऐकणार नाही, असं भुजबळांनी (Chhagan Bhujbal) म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

Chhagan Bhujbal | ‘आता मराठा शिल्लक राहणार नाही’; भुजबळांचं मोठं वक्तव्य

Qualities In Men | महिलांना आकर्षित करण्यासाठी पुरुषांकडे हवेत ‘हे’ गुण

Weather Update | राज्यात ‘या’ तारखेपासून थंडीचा जोर, हवामान विभागाचा इशारा

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शरद पवारांना मोठा धक्का!

FD करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर!