FD करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मुदत ठेव (FD) ही कमी जोखीम आणि खात्रीशीर परताव्याची गुंतवणूक मानली जाते. देशातील जवळपास प्रत्येक कुटुंबाकडे किमान एक FD आहे. आजकाल बँकाही एफडीवरील व्याजदरात बदल करून लोकांना आमिष दाखवत आहेत. अशात Fix Deposit मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

FD करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

मिळालेल्या माहितीनुसार, देशातील काही बँका FD वरील व्याजदर 10 टक्क्यांपर्यंत वाढवू शकतात. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या स्थितीला देशातील काही स्मॉल फायनान्स बँका एफडीवर 9.5% पर्यंतचे व्याजदर देत आहेत.

रिझर्व बँक ऑफ इंडिया अर्थातच आरबीआयने रेपो रेट मध्ये वाढ केला तर हे एफडी वरील व्याजदर तब्बल दहा टक्क्यांपर्यंत करणार असा दावा केला जात आहे. मात्र काही तज्ञांनी आरबीआय रेपो रेटमध्ये वाढ करणार नाही असं स्पष्ट केलं आहे.

FD च्या व्याजदरात जोपर्यंत आरबीआय रेपो रेटमध्ये बदल करत नाही तोपर्यंत बदल होणार नाही. म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवले तर एफडीचे व्याजदर देखील वाढू शकतात.

‘या’ बँकांनी वाढवले FD वरील व्याजदर 

दरम्यान, नुकतंच एचडीएफसी आणि आयसीआयसीआय या दोन बँकानी आपल्या ग्राहकांसाठी एफडीच्या व्याजदरात सुधारणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही बँकांनी 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि 5 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवरील व्याजदर वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय नुकताच घेतला आहे.

या दोन्ही बँकांनी सांगितल्याप्रमाणे या निर्णयाची अंमलबजावणी डिसेंबर 2023 पासून होणार आहे. म्हणजेच डिसेंबर पासून एफडी वरील नवीन व्याजदर लागू केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

Aditya Thackeray | दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना झटका, आता…

Pune Crime | ‘माझी नाही तर कोणाचीच नाही…’; पुण्यात घडला धक्कादायक प्रकार

Dhananjay Munde | “बापाची चप्पल पोराच्या पायात आली म्हणजे तो…”

Uddhav Thackeray | ठाकरेंचा मोठा प्लॅन; शिंदे सरकार अडचणीत येणार?

MS Dhoni | “समोरच्या टीमनं 400 बनवले तरी…”, शर्माजीच्या मुलाचं धोनीबद्दल मोठं वक्तव्य