मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Sinh Rajput) याचा 14 जून 2020 या दिवशी मृत्यू झाला. सुशांतच्या मृत्यूच्या पाच दिवस आधी त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिचा मृत्यू झाला. तिचा 9 जून 2020 ला संशयितरित्या मृत्यू झाल्याची घटना समोर आली.
मुंबईच्या मालाडमधल्या एका इमारतीच्या 14 व्या मजल्यावरुन खाली कोसळून तिचा मृत्यू झाल्याची माहिती तेव्हा समोर आली. नंतर तिच्या मृत्यूचा सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाशी संबंध असल्याचं बोललं गेलं. याच प्रकरणात आता आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.
Aditya Thackeray अडचणीत
दिशा सालियान मृत्यू प्रकरणी विरोधकांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. तसंच त्यांच्या चौकशीची मागणी केली होती. आता या प्रकरणी विरोधक आणखी आक्रमक झाले आहेत.
दिशा सालियानचा मृत्यू झाला तेव्हा आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) नेमके कुठे होते? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे आता आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या SIT चौकशीत अनेक पुरावे समोर येणार असल्याची माहिती आहे.
आदित्य ठाकरेंविरोधात याचिका दाखल
मुंबई उच्च न्यायालयात आदित्य ठाकरे यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी करणारी याचिका राशिद खान पठाण यांनी केली आहे.
आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या वकिलांकडून या प्रकरणात कॅव्हेट दाखल करण्यात आली आहे. कोर्टाने कोणताही निर्देश देण्यापूर्वी आदित्य यांची बाजू ऐकून घेण्याची विनंती कॅव्हेटमधून करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Pune Crime | ‘माझी नाही तर कोणाचीच नाही…’; पुण्यात घडला धक्कादायक प्रकार
Dhananjay Munde | “बापाची चप्पल पोराच्या पायात आली म्हणजे तो…”
Uddhav Thackeray | ठाकरेंचा मोठा प्लॅन; शिंदे सरकार अडचणीत येणार?
MS Dhoni | “समोरच्या टीमनं 400 बनवले तरी…”, शर्माजीच्या मुलाचं धोनीबद्दल मोठं वक्तव्य