Dhananjay Munde | “बापाची चप्पल पोराच्या पायात आली म्हणजे तो…”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | शरद पवारांच्या राष्ट्रवादीने धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना थेट लक्ष्य करायला सुरुवात केलीय. पूर्वीच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हुकूमशाही पद्धतीने कारभार चालवला जात होता, असा आरोप बंडखोर अजित पवार गटाने वारंवार केला. कृषिमंत्री धनंजय मुंडेंनी पुनरुच्चार करताना नाव न घेता ज्येष्ठ नेते शरद पवारांवर निशाणा साधला. त्यांच्या याच टीकेवरून राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरेंनी मुंडेंसह अजित पवारांना सुनावलं आहे.

“बापाची चप्पल पोराच्या पायात आली म्हणजे…”

बापाची चप्पल पोराच्या पायात आली म्हणजे तो बापाचा बाप होत नाही, असा खोचक टोला रूपाली पाटील ठोंबरेंनी  धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) लगावला आहे.

बापाची चपल पायात आल्या म्हणजे लेक बापमाणूस पात्रतेचा झाला याचा आनंद बापाला द्विगुणीत नक्कीच असतो. बाप, लेकात, भाऊ, बहिणीत एवढेही नाक खुपसू नये दत्तक पोराने. उठलं की खुपसलं नात्यात नाक, हेच काम उरलं का राजकारणात, असं म्हणत त्यांनी मुंडेंवर (Dhananjay Munde) टीका केलीये.

Dhananjay Munde 1 jpg

काय म्हणाले होते Dhananjay Munde?

स्वतःच्या राजकारणासाठी आपल्या नेत्यांचा वारंवार बळी देणारे लोकशाहीवर भाष्य करत होते. मात्र, पक्षातील लोकशाही टिकवण्यासाठी निर्णय घेणाऱ्यांना खलनायक ठरवण्यात येते, असं म्हणत मुंडेंनी पवारांना लक्ष्य केलं होतं.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी थेट भाजपशी हातमिळवणी केली. यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. अजित पवार यांच्यासोबत नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात धनंजय मुंडेंचा देखील समावेश आहे. धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

‘…तो बापाचा बाप होत नाही’; “ठोंबरेंनी धनंजय मुंडेंना सुनावलं

Uddhav Thackeray | ठाकरेंचा मोठा प्लॅन; शिंदे सरकार अडचणीत येणार?

MS Dhoni | “समोरच्या टीमनं 400 बनवले तरी…”, शर्माजीच्या मुलाचं धोनीबद्दल मोठं वक्तव्य

Health Tips | थंडीत आजारी पडू नये म्हणून काय काळजी घ्यावी?

“मी तोपर्यंत खेळणार, जोपर्यंत…”, IPL मध्ये खेळण्यावरुन ग्लेन मॅक्सवेलचं मोठं वक्तव्य