Pune Crime | ‘माझी नाही तर कोणाचीच नाही…’; पुण्यात घडला धक्कादायक प्रकार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune Crime | पुणे विद्येचं माहेर घर म्हणून ओळखलं जातं. मात्र, याच पुण्यात सध्या कोणाला पोलिसांची भिती  राहिलेली नसल्याचं दिसतंय. पुण्यात गेल्या काही दिवसांपूर्वी कोयता गँगची दहशत निर्माण झाली होती. दरम्यान, पुण्यात आता (Pune Crime) पुन्हा धक्कादायक प्रकार घडलाय.

नेमकं काय आहे प्रकरण?

पुण्यात 19 वर्षीये तरुणीला रस्त्यात अडवून मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. समोर अलेल्या माहितीनूसार तरुणीने आरोपीला लग्न करण्यास नकार दिल्याने हा प्रकार घडला आहे. आरोपी आणि तक्रारदार मुलगी दोघेही एकमेकांना ओळखत होते.

दरम्यान, तरुणी आणि आरोपी या दोघांचं रुपांतर मैत्रीत झालं आणि हळूहळू ओळख वाढत गेली. त्यानंतर आरोपीने मुलीला थेट लग्नाची मागणी घातली. त्यावेळी मुलीने त्याला लग्नाला नकार दिला होता. याचा राग आरोपीच्या मनात राहिला. या रागातून ही तरुणी नाना पेठेतून जात असताना तिला अडवलं आणि तिचा थेट हात पकडला.

पुढे काय घडलं?

तरुणीला कॅम्प चौकात चलण्यास सांगितलं असताना तिने नकार दिला. यामुळे चिडलेल्या प्रशांत कांबळे याने तरुणीला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच ‘तू माझी झाली नाही तर कोणाची होऊ देणार नाही,’ अशी धमकी दिल्याचंही तरूणांनी सांगितलं.

घडलेला सगळा प्रकार पाहून तरूणी घाबरली आणि तिने थेट समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. लग्नासाठी मुलगा विचारत होता मात्र मुलीने नकार दिल्याने त्याने हा प्रकार केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रशांत संजय कांबळे या 20 वर्षीय मुलावर गुन्हा दाखल केला आहे.

Pune Crime- महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ?

पुण्यात महिलांच्या सुरक्षतेबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुण्यात मागील काही दिवसांपासून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे शिक्षणाच्या माहेरघरात महिलाच असुरक्षित आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दर्शना पवार हत्या प्रकरण आणि त्यानंतर सदाशिव पेठेत भर रस्त्यात एकतर्फी प्रेमातून कोयत्याने केलेल्या हल्ल्याने पुण्यासह महाराष्ट्राला हादरवलं होतं.

News Title : pune crime shocking incident happened

थोडक्यात बातम्या-

‘…तो बापाचा बाप होत नाही’; “ठोंबरेंनी धनंजय मुंडेंना सुनावलं

Uddhav Thackeray | ठाकरेंचा मोठा प्लॅन; शिंदे सरकार अडचणीत येणार?

MS Dhoni | “समोरच्या टीमनं 400 बनवले तरी…”, शर्माजीच्या मुलाचं धोनीबद्दल मोठं वक्तव्य

Health Tips | थंडीत आजारी पडू नये म्हणून काय काळजी घ्यावी?

“मी तोपर्यंत खेळणार, जोपर्यंत…”, IPL मध्ये खेळण्यावरुन ग्लेन मॅक्सवेलचं मोठं वक्तव्य