मुंबई | शिंदे सरकारच्या हिवाळी अधिवेशलाना उद्यापासून सुरूवात होणार आहे. या अधिवेशनात विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. अशात हिवाळी अधिवेशनात शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट राज्य सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे.
उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) मोठा प्लॅन
उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सरकारला अडचणीत आणण्यासाठी मोठा प्लॅन केल्याचं बोललं जात आहे. ठाकरेंनी पक्षाच्या सर्व आमदारांना अधिवेशनासाठी विशेष सूचना दिल्याचं कळतंय. अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित केले जाणार आहे.
मुंबईतील आमदारांना सामान्य नागरिकांच्या समस्यावर प्रश्न उपस्थित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबई महापालिकेचा रस्ते काँक्रिटीकरण घोटाळा, फर्निचर घोटाळा व इतर काही महत्त्वाचे घोटाळे समोर आणून राज्य सरकार समोर प्रश्न उपस्थित केले जातील.
ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणावरून सरकारला जाब विचारला जाणार आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण सुद्धा गृह विभाग आणि आरोग्य विभागाला ठाकरे गटातून घेरण्याचा प्रयत्न होणार आहे.
विरोधक ‘या’ मुद्द्यावरून शिंदे सरकारला घेरणार
उद्यापासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात अनेक मुद्द्यावरून चर्चा होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात गाजत असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा यंदाच्या अधिवेशनात चर्चेत येऊ शकतो. मराठा आरक्षणासोबतच ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही विरोधक लावून धरू शकतात.
काही दिवसांआधी राज्यात अवकाळी पाऊस झाला. यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानीची भरपाई, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी या मुद्द्यांवरुन सभागृहात खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
MS Dhoni | “समोरच्या टीमनं 400 बनवले तरी…”, शर्माजीच्या मुलाचं धोनीबद्दल मोठं वक्तव्य
Health Tips | थंडीत आजारी पडू नये म्हणून काय काळजी घ्यावी?
“मी तोपर्यंत खेळणार, जोपर्यंत…”, IPL मध्ये खेळण्यावरुन ग्लेन मॅक्सवेलचं मोठं वक्तव्य
Bollywood News | मद्यधुंद अवस्थेतील सनी देओलचा व्हिडीओ व्हायरल, नेमका खरा प्रकार आहे तरी काय?
Bjp | आत्ताची मोठी बातमीः भाजपच्या 12 खासदारांनी दिला राजीनामा