“मी तोपर्यंत खेळणार, जोपर्यंत…”, IPL मध्ये खेळण्यावरुन ग्लेन मॅक्सवेलचं मोठं वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | ग्लेन मॅक्सवेल सध्या आयपीएलमध्ये (IPL) आरसीबीचा (Royal Challengers Bangalore) भाग आहे. मागील हंगामातही तो याच संघासोबत होता आणि यावेळीही तो आरसीबीसोबत आहे. गेल्या मोसमात अनेक सामन्यांमध्ये मॅक्सवेलची कामगिरी चांगली होती आणि आगामी मोसमातही तो चांगली कामगिरी करेल आणि संघाला विजेतेपद मिळवून देईल अशी आशा आहे. अशात आरसीबीचा (Royal Challengers Bangalore) अनुभवी खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) आयपीएलमध्ये (IPL) खेळण्याबाबत मोठं केलं आहे.

“मी तोपर्यंत IPL खेळणार जोपर्यंत… “

मॅक्सवेलच्या वक्तव्याने मात्र आरसीबीच्या चाहत्यांना नक्कीच खूप आनंद होईल. तो जोपर्यंत मी खेळू शकतो तोपर्यंत तो आयपीएलमध्ये (IPL) खेळेल, असं तो म्हणालाय. जेव्हा ग्लेन मॅक्सवेलला त्याच्या भविष्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तो म्हणाला की त्याने सर्व फॉरमॅट खेळणं थांबवलं तरीही तो आयपीएलमध्ये (IPL)खेळत राहील.

” IPL चा मला खूप फायदा झाला”

आयपीएल ही शेवटची स्पर्धा असेल जी मी खेळेल. माझे पाय जोपर्यंत चालत आहेत तोपर्यंत मी खेळत राहीन. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत आयपीएल किती उत्कृष्ट ठरलंय हे मी पाहत आलोय. मला ज्या प्रकारचे लोक भेटले, प्रशिक्षक, खेळाडू ज्यांसोबत मी खेळलो त्याचा मला माझ्या कारकिर्दीत खूप फायदा झाला. आयपीएलमध्ये तुम्ही एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहलीसारख्या खेळाडूंसोबत दोन महिने खेळता. त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळेल.

कोणत्याही खेळाडूसाठी ही खूप मोठी शिकण्याची गोष्ट आहे. आशा आहे की आपल्या अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळेल, असं ग्लेनने म्हटलंय.

ग्लेन मॅक्सवेलने नुकत्याच झालेल्या विश्वचषकात चमकदार कामगिरी करत संघाला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

महत्त्वाच्या बातम्या- 

Bollywood News | मद्यधुंद अवस्थेतील सनी देओलचा व्हिडीओ व्हायरल, नेमका खरा प्रकार आहे तरी काय?

Bjp | आत्ताची मोठी बातमीः भाजपच्या 12 खासदारांनी दिला राजीनामा

लहान मुलांची काळजी घ्या; मुंबईतून अत्यंत धक्कादायक बातमी समोर

Black Raisins | रोज उठल्यावर काळे मनुके खाण्याचे फायदे ऐकाल तर चकीत व्हाल

Anger | खूप राग येणं जीवावर बेतू शकतं; होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार