लहान मुलांची काळजी घ्या; मुंबईतून अत्यंत धक्कादायक बातमी समोर

मुंबई | नवी मुंबईतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. नवी मुंबई शहरातून मागील 48 तासात सहा अल्पवयीन मुले बेपत्ता झाली आहेत. मुले अचानक बेपत्ता होत असल्यामुळे पालक घाबरले आहेत. गायब झालेली ही सहाही मुले 12 ते 15 वयोगटाची आहेत.

नवी मुंबईतून खळबळजनक घटना समोर

बेपत्ता मुलांचं अपहरण झाल्याची या पालकांची तक्रार आहे. या पालकांनी पोलीस ठाण्यात तशी तक्रारही दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे नवी मुंबईतील पनवेल, कामोठे, कोपर खैरणे, रबाळे, कळंबोली आदी परिसरातील ही मुले असून याच परिसरातून ही मुले गायब झाली आहेत.

यासंदर्भातील तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली आहे. बेपत्ता झालेल्या मुलांचा शोध सुरू करण्यात आला आहे. यापैकी एक अल्पवयीन मुलगा कोपरखैरणे येथील स्टेशनवर सापडला असून इतर मुलांचा शोध सुरू आहे.

नवी मुंबईत भीतीचं वातावरण

मुलं अशी अचानक गायब झाल्याने पालक चांगलेच हादरले आहेत. मुलांचं अपहरण करून त्यांचं काही बरंवाईट तर झालं नाही ना? अशी शंका पालक व्यक्त करत आहेत. मात्र मुलं अशी अचानक बेपत्ता होत असल्याने नवी मुंबईत भीतीचे वातावरण पसरले आहे.

लहान मुलांचा काळजी घ्या

मिळालेल्या माहितीनुसार, कळंबोली परिसरातून एक मुलगी मित्राच्या वाढदिवसाला गेली जी परतली नाही. पनवेलमध्ये एक मुलगी सहकाऱ्याच्या घरी कार्यक्रमासाठी गेली होती. त्यानंतर ती देखील बेपत्ता झाली. कामोठे परिसरात एक मुलगी सोमवारी घरातून बाहेर पडली आणि ती बेपत्ता झाल्याचं समोर आलं. याशिवाय रबाळे येथून शाळेत निघालेली एक मुलगी आणि शौचालयात गेलेला एक मुलगा देखील बेपत्ता झाला आहे.

Very shocking news from Mumbai

महत्त्वाच्या बातम्या-  

Black Raisins | रोज उठल्यावर काळे मणुके खाण्याचे फायदे ऐकाल तर चकीत व्हाल

Anger | खूप राग येणं जीवावर बेतू शकतं; होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

सरकारने Post office FD च्या नियमात केला ‘हा’ मोठा बदल!

Weather Update | राज्यात बुधवारी कसा राहील पाऊस?, सर्वात मोठी बातमी समोर!

Pune News | पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई