Pune News | पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune News | पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील विनापरवाना शॉपिंग मॉलवर पुन्हा एकदा महापालिकेने (Pune News) कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये या रस्त्यावरील सुमारे 7 हजार चौरस फूट इतकं मोठं बांधकाम थेट जमीनदोस्त करण्यात आलं आहे. या कारवाईमुळे फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

कशी करण्यात आली कारवाई?

फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील शिरोळे प्लॉटवर हा बेकायदा मॉल उभा होता. या मॉलमध्ये तब्बल 70 शॉप चालू होती. महापालिकेने याआधी या बेकायदा बांधकामावर हातोडा उगारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र जागामालकाने न्यायालयात धाव घेतल्याने त्यावर स्थगिती आली होती. (Pune News)

अखेर ८ वर्षानंतर न्यायालयाने स्थगिती उठवल्याने या बांधकामावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या पथकाने सहभाग घेतला. कारवाईसाठी जेसीबी, गॅस कटर, ब्रेकर इत्यादी साहित्यांचा वापर करण्यात आला. ही कारवाई सुमारे दोन तास चालली होती. यावेळी बघ्याची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

या कारवाईनंतर बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता युवराज देशमुख यांनी सांगितले की, “या मॉलच्या बांधकामासाठी महापालिकेची परवानगी नव्हती. या मॉलमुळे फर्ग्युसन रस्त्यावर वाहतुकीचा ताण वाढला होता. तसेच, या मॉलमध्ये हवा उजेडाची सोय नसल्याने आगीसारखी दुर्घटना घडण्याची भीती देखील होती. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.”

Pune News: FC रोडवरील कारवाईमुळे काय साध्य होणार?

-फर्ग्युसन रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होईल, आगीसारख्या दुर्घटना घडण्याचा धोका कमी होईल, शहराचं विद्रुपीकरण कमी होऊन शहराच्या सौंदर्यामध्ये वाढ होईल

दरम्यान, या कारवाईमुळे पुण्यातील बेकायदेशीर बांधकाम करणारांना एक मोठा इशारा मिळाला आहे. यामुळे इतर बेकायदेशीर बांधकामधारकांनाही धडा मिळेल

महत्त्वाच्या बातम्या-

Weather Update | महाराष्ट्रातील ‘या’ भागांना पुन्हा पावसाचा इशारा, शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला

Ishan Kishan | “फक्त 3 सामने खेळून दमला का?”, बड्या खेळाडूचा सवाल

Hardik Pandya | हार्दिक पांड्या आता लवकर संघात दिसणार नाही!, मोठी बातमी आली समोर

Online Game | पोलिसाच्या पत्नीचं नशीब उजळलं, करोडो रुपयांसह आयफोन-बुलेटही मिळाली

Weather Update 1 | विजांच्या कडकडाटासह पाऊस, महाराष्ट्रातील ‘या’ भागांना मोठा अलर्ट!