Ishan Kishan | “फक्त 3 सामने खेळून दमला का?”, बड्या खेळाडूचा सवाल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ishan Kishan | टीम इंडियाने (Team India) विराट कोहली आणि रोहित शर्माच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20 मालिकेत (IND vs AUS) शानदार विजय नोंदवला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाहुण्यांना 5 सामन्यांच्या मालिकेत फक्त एकच सामना जिंकू दिला. ही मालिका भारतीय संघासाठी चांगली राहिली असली तरी या मालिकेतील प्रयोगांवरुन आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. (IPL 2024)

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत आगामी टी-20 विश्वचषक (T20 World Cup) डोळ्यासमोर ठेवून काही नवीन खेळाडूंवर प्रयोग करण्यात आले, त्यापैकीच एक म्हणजे ईशान किशन… ईशानने या मालिकेत सलग दोन अर्धशतकं झळकावली. मात्र त्याला शेवटच्या दोन सामन्यांमध्ये चक्क बाकावर बसवण्यात आलं, याच गोष्टीमुळे भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने (Ajay Jadeja) भारतीय संघ व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

नेमकं काय म्हणाला अजय जडेजा?

“वर्ल्डकपनंतर लगेचच ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची टी-20 मालिका होती. ईशान किशनने (Ishan Kishan) 3 सामने खेळले, त्यानंतर मात्र उर्वरित दोन सामन्यांसाठी त्याला चक्क विश्रांती देण्यात आली. तीन सामन्यांनंतर तो खरोखर इतका थकला होता का की त्याला विश्रांतीची गरज होती?, असा प्रश्न अजय जडेजाने विचारला आहे.

हे असेच चालू राहिल्यास ईशान किशन टी-20 वर्ल्डकपसाठी पूर्णपणे तयार आहे की नाही, याची खात्री तुम्ही कशी कराल?. संघात जागाच न मिळाल्याने विश्वचषकातील अनेक सामनेही तो खेळू शकलेला नाही. विश्वचषकाच्या पहिल्या काही सामन्यांसाठी तो प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यास पात्र होता. किती भारतीय खेळाडूंनी चांगल्या वेळी द्विशतक ठोकले आहे?, असा सवाल देखील अजय जडेजाने उपस्थित केला आहे.

अजय जडेजाने स्वतःच्या यूट्यूब चॅनलवर ईशान किशनचे (Ishan Kishan) गुणगान गायलेलं दिसून येत आहे. ईशान किशनबद्दल बोलताना तो म्हणाला, की “ईशानची वृत्ती खूप चांगली आहे. तो चांगला खेळतो, तेव्हा मला मनापासून आनंद होतो. तो सर्वांना आनंद देणारा खेळाडू आहे. तो मैदानाबाहेरही चांगला आहे. प्रत्येक खेळाडूची बॅट, हातमोजे आणि हेल्मेट तो तयार ठेवतो आणि स्वतःला संघाबाहेर बसायला लागल्यावर देखील त्याची कधी तक्रार नसते.”

दरम्यान, टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (SAvIND) तीन टी-20 सामने खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. 10 डिसेंबरपासून ही मालिका सुरू होणार आहे. BCCIने या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली असून त्यात ईशान किशनचाही समावेश आहे. आता प्लेईंग इलेव्हनमध्ये ईशानला संधी मिळते की नाही आणि मिळाली तर तो कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष आहे.

ही बातमी तुम्ही वाचली का?: Hardik Pandya | हार्दिक पांड्या आता लवकर संघात दिसणार नाही!, मोठी बातमी आली समोर

News Title: ajay jadeja  raised issue about ishan kishan

महत्त्वाच्या बातम्या-

Online Game | पोलिसाच्या पत्नीचं नशीब उजळलं, करोडो रुपयांसह आयफोन-बुलेटही मिळाली

Weather Update 1 | विजांच्या कडकडाटासह पाऊस, महाराष्ट्रातील ‘या’ भागांना मोठा अलर्ट!

Sexual Disease | सावधान! शरीरसंबंध ठेवताना काळजी घ्या, वेगानं वाढतोय ‘हा’ आजार!

Cough Syrup | खोकल्यासाठी कफ सीरप पिताय?, आधी ही बातमी नक्की वाचा