Online Game | पोलिसाच्या पत्नीचं नशीब उजळलं, करोडो रुपयांसह आयफोन-बुलेटही मिळाली

Online Game | जगभरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण ऑनलाईन (Online Game) गेमच्या आहारी जाताना दिसत आहेत. ऑनलाईन गेम खेळताना काहीजण त्यातून पैसे देखील कमवतात. आपण अनेक वेळा ऐकलं आहे की, काही जणांना या ऑनलाईन गेमच्या माध्यामातून पैसे किंवा इतर गोष्टी बक्षीस म्हणून मिळतात. दरम्यान, एका महिलेला ऑनलाईन गेमच्या माध्यमातून चक्क बुलेट मिळाली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

ऑनलाईन गेम (Online Game) खेळत असताना एका महिलेचं नशीब पालटलं आहे. दरम्यान, ही महिला एका पोलीस काॅन्स्टेबलची पत्नी आहे. हा प्रकार उत्तर प्रदेशमधील संत कबीर नगरमध्ये घडला आहे. संत कबीर कारागृहात तैनात असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलच्या पत्नीने रातोरात एक कोटी रुपये जिंकले आहेत.

कॉन्स्टेबल देवेश मिश्राची पत्नी अर्चना या काही दिवसांपूर्वी ऑनलाइन स्पोर्ट्स बेटिंग साइटवर गेम खेळत होत्या. त्यानंतर या साइटवर अर्चना यांनी एक टीम तयार केली. त्यानंतर अर्चना या गेममध्ये जिंकल्या आणि एका रात्रीतून अर्चना यांचं नशीब उजळलं.

कोणतं बक्षीस मिळालं?

अर्चना यांनी गेम जिंकल्यावर त्यांना यामध्ये फक्त पैसेच नाही तर इतरही गोष्टीही भेटवस्तू म्हणून मिळाल्या आहेत. यामध्ये त्यांना एक कोटी रुपये तर मिळालेच, इतकेच नव्हे तर बोनस म्हणून आयफोन आणि रॉयल एनफिल्ड बुलेट गाडीही मिळाली आहे.

ही घटना व्हायरल होताच अनेकांनी अर्चना यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी गर्दी केली होती. ऑनलाइन गेममधून एक कोटी रुपयांचे बक्षीस जिंकल्यानंतर अर्चाना यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

Online Game जिंकल्यावर अर्चाना यांची प्रतिक्रिया-

माध्यमांशी बोलत असताना अर्चना म्हणाल्या, “मला माझे नशीब अशा प्रकारे साथ देईल असे कधीच वाटले नव्हते.” अर्चना या देवरिया येथील रहिवासी आहेत, तर त्यांचा नवरा संत कबीर नगर येथे कॉन्स्टेबल आहे.

News Title : online game police wife became millionaire

थोडक्यात बातम्या –

Weather Update 1 | विजांच्या कडकडाटासह पाऊस, महाराष्ट्रातील ‘या’ भागांना मोठा अलर्ट!

Sexual Disease | सावधान! शरीरसंबंध ठेवताना काळजी घ्या, वेगानं वाढतोय ‘हा’ आजार!

Cough Syrup | खोकल्यासाठी कफ सीरप पिताय?, आधी ही बातमी नक्की वाचा

Farmer Issue | शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार?, संसदेत पहिल्याच दिवशी घुमला आवाज

Rain Update: अन् पाहता पाहता पावसाच्या पाण्यात कार वाहू लागल्या… भयानक दृश्यं