Sexual Disease | सावधान! शरीरसंबंध ठेवताना काळजी घ्या, वेगानं वाढतोय ‘हा’ आजार!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sexual Disease | शारीरिक संबंध ठेवत असाल तर सावधगीरी बाळगा, कारण यामुळे तुम्हाला मोठा आजार होऊ शकतो. ज्याचा परिणाम थेट तुमच्या डोळ्यांवर होईल. माध्यमांच्या माहितीनूसार शारीरिक संबंधांमधून एक आजार वेगानं पसरतोय, ज्यामुळे तुमच्या डोळ्यांना धोका तयार होऊ शकतो.

काय आहे नेमकं कारण?

दरम्यान माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनूसार, अमेरिकेतील मिशिगनमध्ये डोळ्यांशी संबंधित ‘ऑक्युलर सिफिलीस’ (Ocular Syphilis) या आजाराची लागण झाल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. येथील एका व्यक्तीने पाच महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवले होते, त्यानंतर या महिलांना (Sexual Disease) हा आजार झाल्याचं उघडकीस आलं आहे.

काय आहे ऑक्युलर सिफिलीस?

‘ऑक्युलर सिफिलीस’ हा आजार (Sexual Disease) सध्या वेगाने पसरत आहे. हा आजार तसा सर्वसाधारण नाही पण संक्रमण झालेल्यांपैकी एक टक्के प्रकरण ऑक्युलर सिफलिसची असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याच आजारeचे अणखी वेगवेiळे प्रकार देखील आहेत. मात्र, या आजाराचे निदान करणे अवघड असल्याचं समोर येत असलेल्या माहितीवरुन कळतंय.

मात्र, याबाबत एक दिलासादायक बाब म्हणजे यावरील उपचार फार अवघड नाहीत, मात्र जर दुर्लक्ष केलं तर ऑक्युलर सिफीलीस त्रासदायक ठरु शकतो. ज्यामुळे तुमच्या शरिरितील विविध अवयवांना नुकसान पोहोचू शकतं.

Sexual Disease धोका निर्माण होऊ शकतो?

हा आजार डोळ्यांच्या प्रत्येक स्नायूंना प्रभावित करू शकतो. ज्यात कॉर्निया, आयरीस, ऑर्बिट, पापण्या, रेटीना, ऑप्टीक तंतू आणि श्वेतपटल यांचा समावेश आहे. हा आजार सूजेच्या स्वरुपात प्रकट होत असतो, तर काही वेळी संक्रमण एकदम सुक्ष्म स्वरुपात देखील असू शकते.

दरम्यान, या (Sexual Disease) आजारावरील उपचार थांबवले तर अन्य उपचार होऊ शकणाऱ्या आजारांचा उपचारात अडथळा येऊ शकतो. उदाहरणार्थ एचआयव्ही संक्रमण सिफिलीस रोग्यांमध्ये सर्वसामान्य बाब आहे. एचआयव्ही संक्रमणामुळे ऑक्युलर सिफीलीस वेगाने वाढू शकतो.

याशिवाय, डोळ्यांशी संबंधित सिफिलीसचे निदान न झाल्यास उपचार होऊ शकणाऱ्या HIVचे देखील निदान होणार नाही. मिशिगनमधील ज्या पाच महिलांना हा आजार झाला आहे त्यांना एकाच पुरुषांपासून हा आजार झाला होता. त्यामुळे शारीरिक संबंध ठेवताना काळजी घेणं फार गरजेचं आहे.

News Title : sexual disease can increase rapidly

थोडक्यात बातम्या-

Rain Update: अन् पाहता पाहता पावसाच्या पाण्यात कार वाहू लागल्या… भयानक दृश्यं

Bollywood News | ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता मृत्यूच्या दारात, सिनेसृष्टीत एकच खळबळ

Weather Update | पुढच्या वर्षी देखील पाऊस नाही?, हवामान विभागाचा मोठा इशारा

Nashik | चालू व्याख्यानात विश्वंभर चौधरींना धक्काबुक्की, भाजप पदाधिकाऱ्यांसह ‘या’ लोकांवर आरोप

Pune Crime | पैशांचा पाऊस पाडण्यासाठी सुरु होती पूजा, तेवढ्यात… पुण्यात धक्कादायक प्रकार