Pune Crime | पैशांचा पाऊस पाडण्यासाठी सुरु होती पूजा, तेवढ्यात… पुण्यात धक्कादायक प्रकार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune Crime | पुण्यात अलिकडच्या काळात गुन्हेगारी वाढत चालली असताना दिसत आहे. शिवाय पुण्यात (Pune crime) कधी काय होईल सांगता येत नाही. दरम्यान, पुण्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, जी ऐकून तुमच्या देखील भुवया उंचावतील.

काय आहे प्रकरण?

पुण्यात गुन्हेगारांना पोलिसांची अजिबात भीती राहिलेली नाही, असं चित्र आहे. कधी कोयता गँगची (Koyta Gang) दहशत तर कधी जीवघेणे प्रकार. दरम्यान, पुण्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील हडपसर परिसरात चक्क एका भोंदू बाबाने तरुणाला 18 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार घडलाय.

पुण्यातील हडपसर (Hadpasar) परिसरात भोंदूबाबाने पाच लाख रुपयांचा वापर करुन कोट्यवधी रुपयांच्या पैशाचा पाऊस पडतो, असा दावा एका तरुणाला केला होता. संबंधित तरुणाला या भोंदू बाबाने एक एक करत तबबल 18 लाख रुपयांचा गंडा घातला.

दरम्यान, पैशांचा पाऊस पाडण्याची पूजा सुरू असताना अचानक त्या ठिकाणी काही तोतया पोलिस (police) आले. बाबासह त्यांनी तरुणाला ताब्यात घेतलं. दोघांना मारहाण करत या ठिकाणी पूजेसाठी ठेवलेले 18 लाख रुपये घेतले आणि पसार झाले. हा सगळा डाव या भोंदू बाबाने रचला असल्याचे समजताच फिर्यादीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी आता भोंदू बाबासह तिघांचा शोध पोलीस घेत आहेत.

Pune Crime पोलिसांचं आवाहन-

घडलेल्या प्रकारावरुन पुणे पोलिस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत. यामध्ये भोंदू बाबा आईरा शॉब, माधुरी मोरे, रॉकी वैद्य आणि किशोर पंडागळे अशा चार जणांवर हडपसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी एक आवाहन केलं आहे. असे प्रकार वारंवार समोर येत आहेत, तरी नागरिकांनी अशा गोष्टींना बळी पडू नका, असे आवाहन पोलीस आणि अंधश्रध्दा निर्मूलन समितीने केले आहे.

News Title : pune crime dont fall for this victim

थोडक्यात बातम्या-

Weather Update | मिचौंग चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात काय होणार?, हवामान विभागाचा मोठा इशारा

Telangana Election 2023 | सर्वात मोठी बातमी: तेलंगणात तत्कालीन मुख्यमंत्र्यासह भावी मुख्यमंत्र्याचाही पराभव

Taimur Ali Khan | लेकानं केलेल्या ‘या’ कामगिरीनं सैफ अली आणि करिनाला आभाळ ठेगणं

Ajit Pawar | ‘मला अमित शहांनी…’; निकालानंतर अजित पवारांचा मोठा खुलासा

Assembly Election Result 2023 | तेलंगणामध्ये काँग्रेसच्या विजयाचा भाजपला फायदा?