Weather Update | मिचौंग चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात काय होणार?, हवामान विभागाचा मोठा इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Weather Update | महाराष्ट्रात गेले काही दिवस अवकाळी पाऊस सुरु आहे. राज्याच्या अन्य भागात पाऊस थांबायचं नाव घेत नाहीये. गेल्या आठवड्यापासून हवमान विभाग पावासाचा इशारा देत आहे. यंदा होत असलेल्या अवकाळी (Heavy Rainfall) पावसामुळे राज्यातील काही भागात रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे.

दरम्यान, हवामान विभागाने (Department of Meteorology) राज्यातील काही भागांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हवामान विभागाने पुढील 24 तासात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देखील पावसाचा जोर कायम दिसत आहे.

हवामान विभागाने काय सांगितलं?

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे, यामुळे 3 डिसेंबर रोजी नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात ‘मिचौंग चक्रिवादळ’ (Michaung Cyclone) आलं आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे. महाराष्ट्रात त्यामुळे पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

ऐन हिवाळ्यात राज्यातील काही भागात गारठा तर काही भागात पावसाचं वातवरण आहे. त्यामुळे नागरिकांची तारांबळ होत असताना दिसत आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार (Weather Update)  या चक्रीवादळामुळे राज्यातील हवामानात बदल होण्याची शक्यता वर्तवली आहे. आज बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, राज्यात अवकाळी पाऊस असणार आहे.

चक्रीवादाळाचा परिणाम काय?

राज्यभर सुरु असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसमोर प्रश्न पडला आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुसान झालं आहे. यंदा शेतकऱ्यांचे हाल होणार आहे. तर काही भागात हवामान कोरडंच राहणार आहे. कोकण किनारपट्टीवर कोरडं वातावरण असणार आहे. मुंबई, ठाणे,पालघर या भागात गारठा जाणवणार आहे.

Weather Update: 24 तासात पडणार पाऊस-

पुढील दोन दिवस राज्यात ठिकठिकाणी रिमझिम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. मराठवाड्यात आणि विदर्भात वीजांच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.  24 तासांत विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

News Title : Weather Update Michoung localized unseasonal rain

थोडक्यात बातम्या-

Taimur Ali Khan | लेकानं केलेल्या ‘या’ कामगिरीनं सैफ अली आणि करिनाला आभाळ ठेगणं

Ajit Pawar | ‘मला अमित शहांनी…’; निकालानंतर अजित पवारांचा मोठा खुलासा

Assembly Election Result 2023 | तेलंगणामध्ये काँग्रेसच्या विजयाचा भाजपला फायदा?

मोदी होणार प्रसन्न?, Diya Kumari यांच्याकडे राजस्थानचं मुख्यमंत्रिपद???

Assembly Election result 2023 | निकालाआधीच काँग्रेस सावध; आमदारांना ठेवणार ‘या’ ठिकाणी