Assembly Election result 2023 | निकालाआधीच काँग्रेस सावध; आमदारांना ठेवणार ‘या’ ठिकाणी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Assembly Election result 2023 | देशातील चार राज्यांमध्ये सध्या निवडणूक (Assembly Election result 2023) होत आहे. तेलंगणा, मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा आज निकाल लागतोय. या पार्श्वभूमीवर आमदारांची पळवापळवी होण्याची शक्यता अधिक आहे.

निकालाआधीच काँग्रेस सावध

आमदारांची फोडाफोडी रोखण्यासाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. निकालाआधीच (Assembly Election result 2023) काँग्रेसने सावध पवित्रा घेतलाय. घोडेबाजारी टाळण्यासाठी काँग्रेसने मोठा निर्णय घेतलाय.

आमदारांना एकाच रिसॉर्टमध्ये ठेवणार

सर्व आमदारांना एकाच रिसॉर्टमध्ये ठेवण्याच्या काँग्रेस हायकमांडकडून सूचना देण्यात आल्या आहेत. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यावर काँग्रेसकडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. शिवकुमार यांना हे आमदार सांभाळण्यास सांगण्यात आलं आहे.

आमदारांची तोडफोड रोखण्यासाठी डीके शिवकुमार यांच्यासह कर्नाटकाचे 11 मंत्री हैदराबादला पोहोचले आहेत. प्रत्येक उमेदवारासोबत एक कार्यकर्ता देण्यावर काँग्रेसने भर दिला आहे. हा कार्यकर्ता उमेदवाराचं संरक्षणही करेल आणि त्याच्यावर नजरही ठेवून राहील, यासाठी हा कार्यकर्ता देण्यात आला आहे.

कुठे काँग्रेस अन् कुठे भाजप?

दरम्यान, राजस्थानमध्ये भाजप सत्तेत येत असल्याचे दिसून येत आहे. म्हणजेच राजस्थानमध्ये दर पाच वर्षांनी सत्ताबदल होण्याचा क्रम यंदा सुरु राहिला आहे. काँग्रेससाठी तेलंगणातून चांगली बातमी आहे. तेलंगणात काँग्रेस बहुमताकडे जोराने वाटचाल करत आहे. छत्तीसगडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काट्टेंकी टक्कर सुरु आहे.

Assembly Election result 2023

महत्त्वाच्या बातम्या- 

Congress | काँग्रेसने उचललं मोठं पाऊल; महाराष्ट्रातील ‘या’ बड्या नेत्यावर मोठी जबाबदारी

मोठी बातमी! CID फेम फ्रेड्रिक्सला हृदयविकाराचा झटका

Animal Movie | रणबीर कपूर-तृप्ती डिमरी यांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, इंटरनेटवर खळबळ

Assembly Election Results 2023 | ‘या’ राज्यांमध्ये भाजप सुसाट, काँग्रेसला मोठा धक्का

Neena Gupta | ‘महिलांनी फक्त पतीला…’ नीना गुप्ता यांचं पु्न्हा खळबळजनक वक्तव्य